Home Breaking News बुलडाणा जिल्ह्यात 225 आरोपींचे तडीपारीचे प्रस्ताव प्रस्तावित! या गुन्हेगारावर लागला मुंबई...

बुलडाणा जिल्ह्यात 225 आरोपींचे तडीपारीचे प्रस्ताव प्रस्तावित! या गुन्हेगारावर लागला मुंबई झोपडपट्टी दादा कायदा!!

जिल्ह्यात आतापर्यंत 11 गुन्हेगार तडीपार

 

बुलडाणा (प्रशांत खंडारे ) : चिखली येथील सय्यद समीर सय्यद जहीर या 22 वर्षीय युवकावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने 2013 नंतर प्रथमच एम.पी.डी.ए. (मुंबई झोपडपट्टी दादा कायदा)  कायद्याअंतर्गत कारवाई केली. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एम.पी.डी.ए. कायद्यात झोपडपट्टी दादा, अमली पदार्थांची तस्करी करणारे, हातभट्टीवाले, वाळू माफिया, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे आणि व्हिडिओ, सी.डी.ची कॉपी करून विकणारे अशा व्यक्तींचा धोकादायक व्यक्तींमध्ये समावेश होतो. ज्यांच्यामुळे सामाजिक कायदा आणि जनजीवन विस्कळीत होऊ शकते, अशा व्यक्ती धोकादायक असतात. असाच गुन्हेगार चिखली येथील गोरक्षण वाडीत राहणारा 22 वर्षीय सय्यद समीर सय्यद जहीर याच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते यांच्या नेतृत्वात पो.नि.अशोक लांडे यांनी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या गुन्हेगारांविरुद्ध चिखली पोलिस ठाणे अंतर्गत शरीराविरुद्ध व मालमत्ताविरुद्धचे एकूण 19 गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हेगार सण उत्सवाच्या काळात परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने एमपीडीएचा रस्ता तयार करण्यात आला. जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांनी आदेश पारित केल्याने सय्यद समीर सय्यद जहीर नवा एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. जिल्हा गुन्हेगारी मुक्त संकल्पनेतून आतापर्यंत 11 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. दरम्यान सण उत्सवाच्या काळात गुन्हेगार, धोकादायक इसम व टोळी विरुद्ध खडक प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.225 आरोपींचे तडीपारीचे प्रस्ताव, 17 टोळ्या तर 9 एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. चिखलीत मात्र 2013 नंतर प्रथमच कारवाई झाल्याने गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here