Home खामगाव तालुका जिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे

जिल्हा केंद्रीय बँकेवर स्वप्निल ठाकरे तर खविसंवर बाळकृष्ण चतारे

खामगाव- बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर स्वप्निल संजय ठाकरे तर खरेदी विक्री संस्थेवर घाटपुरी येथील बाळकृष्ण चतारे यांची पार पडलेल्या आमसभेत निवड करण्यात आली.
ग्रामिण भागात अति महत्व असलेल्या ग्रामसेवा सहकारी सोसायटीमधून जिल्हा केंद्रीय सहकारी बँक व तालुका स्तरावरील शेतकी खरेदी विक्री संस्थेवर मतदार म्हणून दोन प्रतिनिधींची निवड करण्यात येते. घाटपुरी, पारखेड व कुर्‍हा ही तीन गावे मिळून एक सहकारी सोसायटी असून या सोसायटी सदस्यांची आमसभा नुकतीच पारखेड येथे पार पडली. या आमसभेत जिल्हा बँकेसाठी मतदार म्हणून स्वप्निल संजय ठाकरे व खरेदी विक्री संस्थेसाठी घाटपुरी येथील बाळकृष्ण चतारे या दोघांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या आमसभेला पारखेड येथील गजानन देवचे, विजय तळपते, एकनाथ हेलगे, नरेंद्र शिंगोटे, गणेश यादगिरे, हरिभाऊ यादगिरे, तुळशिराम गावंडे, पुरुषोत्तम टिकार, घाटपुरी येथील मुरलीधर दळवी, रविंद्र दळवी, विठोबा दळवी, मंगेश दळवी, संतोष चतारे, लक्ष्मण ठाकरे, गणेश बोडखे, मुरलीधर मिरगे, देविदास मुंडोकार आदींसह तिन्ही गावातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here