Home खामगाव - जालना रेल्वे खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी आ सौ श्वेताताई महाले यांचा ‘असा’ पााठपुरावा!

खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी आ सौ श्वेताताई महाले यांचा ‘असा’ पााठपुरावा!

आ सौ श्वेताताई महाले यांची रेल्वे मंत्री ना रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

मुंबई :  ब्रिटीश काळापासून रखडलेल्या खामगाव जालना रेल्वेमार्गाचे काम सुरू करणे साठी राज्यशासन व रेल्वे मार्गास गती देण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी रेल्वे मंत्री ना रावसाहेब दानवे यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
दि 8 सप्टेंबर 2021 रोजी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब पाटील दानवे यांची नरिमन पाइंट येथील महारेल या मुंबई येथील कार्यालयात जाऊन भेट घेऊन खामगाव जालना रेल्वे मार्गाबाबत निवेदन दिले .

रेल्वेमार्गासंदर्भात उच्च अधिकाऱ्याची बैठक

आ सौ श्वेताताई महाले पाटील खामगाव जालना रेल्वे मार्गाचे निवेदन देण्यासाठी महारेलच्या कार्यालयात गेल्या असता ना रावसाहेब दानवे पाटीलसाहेब राज्यातील नवीन रेल्वेमार्गासंदर्भात उच्च अधिकाऱ्याची बैठक घेणार होते . त्याच विषयाचे निवेदन घेऊन आ सौ श्वेताताई महाले या गेल्याने ना दानवे साहेब यांनी त्यांना त्या मिटिंगमध्येच बसण्यास सांगितले . त्यावेळी राज्य शासन पुणे -नाशिक व इतर पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे लाईनचा हिस्सा भरण्यास तयार असल्याचे समजले परंतु विदर्भ मराठवाडा जोडणाऱ्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने अजूनही हमी दिलेली नाही . त्यावर आ सौ श्वेताताई महाले यांनी सांगितले म्हटले आहे की, ब्रिटिश काळातील शेकडो वर्षांपासून प्रलंबित असणारा खामगाव – जालना रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी भारत सरकारच्या पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मान्यता दिल्याने सदर मार्गाचे
सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आ सौ श्वेताताई महाले यांनी खामगाव जालना या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरावा यासाठी या संदर्भात दि. 4 मार्च 2020 रोजी तारांकित प्रश्न क्र 1709 विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून खामगाव जालना रेल्वेमार्गाच्या विषयाला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सभागृहात वाचा फोडली होती . त्या प्रश्नाच्या उत्तरात या रेल्वेमार्गात येणाऱ्या अडचणी दूर करून सदर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही परिवहन मंत्री ना अनिल परब यांनी दिले आहे
त्या अनुषंगाने दि 9 फेब्रुवारी 2021 रोजी परिवहन मंत्री ना अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली आहे . या बैठकीला सुधीर पटेल मुख्य अभियंता , सुरेश जैन उपमुख्य परिचलन प्रबंधक सर्वेक्षण मुख्यालय मुंबई आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते . सदर बैठकीत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देखील परिवहन मंत्री यांनी दिले आहे.

राज्यशासन व रेल्वे अधिकारी यांची बैठक घ्या
-आ सौ श्वेताताई महाले
खामगाव जालना रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे .
जेणेकरून जालना आणि बुलढाणा या मागास असलेले जिल्ह्यात उद्योग धंदे वाढून रोजगार निर्मिती होऊन विकासाला चालना मिळेल.
सदर रेल्वेमार्गाचे काम गतीने व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाचे मंत्री अधिकारी , रेल्वे अधिकारी यांचे समवेत बैठक बोलावून या रेल्वेमार्गातील सर्व अडथळे दूर करून खामगाव जालना या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशी ही विनंती आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here