Home धर्म जागरण श्रींचे संजीवन समाधीला 111 वर्षे पूर्ण; ऋषीपंचमी दिनी असा राहील सोहळा

श्रींचे संजीवन समाधीला 111 वर्षे पूर्ण; ऋषीपंचमी दिनी असा राहील सोहळा

शेगाव  : कोरोना चे सावटामुळे श्री गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त ऋषीपंचमी दिनी सलग दुसऱ्या वर्षीही संतनगरीतून पालखी सोहळा निघणार नसून नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जाणार आहे

8 सप्टेंबर 1910 ( ऋषीपंचमी तिथीला) सदगुरु श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली होती.तिथीनुसार ऋषीपंचमीला  महाराजांचे समाधीला 111 वर्षे पूर्ण झालीत.
श्री गजानन महाराज संस्थान कडून श्रींचा प्रकटदिन,रामनवमी व पुण्यतिथी हे प्रमुख तिन उत्सव लाखो भाविकांच्या साक्षीने साजरे झालेत,सोबतच आषाढी, कार्तिकी एकादशीनिमित्त निमित्ताने सुद्धा संतनगरीतून भव्य पालखी सोहळा काढण्यात येतो.मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे मागील वर्षापासून श्री गजानन महाराज संस्थान चे माध्यमातून श्री चे उत्सव बंद आहेत.11सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी दिनी श्रींचा पुण्यतिथी उत्सव ही सलग दुसर्या वर्षीही साजरा केल्या जाणार नाही.त्यामुळे संतनगरीत गावोगावीच्या भजनी दिंड्यांचे आगमन ,भगव्या पताका,टाळ-मृदंगाचा गजर,शहरात जागोजागी भंडारे,महाप्रसाद वितरण,सर्वत्र भक्तीमय वातावरण, गण गण गणात बोते चा नामजप,श्रींचा जय घोष,भजनी भारूडे,किर्तन,प्रवचन इत्यादी पासून भक्तांना वंचित  राहावे लागत आहे. शेगावात लाखो भाविकांची हजेरी असायची,शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून दिसायचे,हे चित्र सध्या कोरोना ने हिरावून घेतल्याची खंत भाविक व्यक्त करीत.

भक्तांना संस्थानचे आवाहन

कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन नियमाचे पालन करीत भाविक भक्तांनी घरीच श्री गजानन महाराजांचे पूजन करावे,व जिथे आहात तेथूनच श्रींचे दर्शन घ्यावे,कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा,गर्दी करू नये,असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थान चे वतीने करण्यात आले आहे.

भाऊंच्या अनुपस्थितीत पहिला सोहळा

श्री गजानन महाराज संस्थान चे  व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनानंतर  तब्बल 60 वर्षानंतर प्रथमच श्री गजानन महाराज पुण्यतिथीचा पहिला सोहळा आहे.त्यातहीकोरोनाचे सावटामुळे हा सोहळा होणार नाही.प्रत्येक सोहळ्यात शिवशंकरभाऊ पाटील यांचे हस्ते श्रीं चे रजत मुखवट्याचे पूजन तसेच होमहवन मध्ये पूर्णाहुती होत होती.

शासन नियमानुसार  पुजाविधी

कोरोनाचे सावटामुळे श्री गजानन महाराज संस्थान चे वतीने शासन नियमानुसार पुण्यतिथी उत्सवानिमित्त अंतर्गत पुजाविधी मोजक्या सेवेकर्यांचे उपस्थितीत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here