Home नांदुरा जिगाव प्रकल्पाचे नामकरण राष्ट्रमाता जिजाऊ महासागर करा – मराठा पाटील युवक समिती

जिगाव प्रकल्पाचे नामकरण राष्ट्रमाता जिजाऊ महासागर करा – मराठा पाटील युवक समिती

नांदुरा : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे योगदान हे जागतिक कीर्तीचे आहे.यामुळेच बुलडाणा जिल्हा जगभर मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जात – पात – धर्म यापलीकडे जाऊन जिजाऊंनी छत्रपती घडविले. व प्रजेला शिकवण देऊन अनेक लोकाभिमुख कामे केली.यातून हिंदवी स्वराज्य उभे राहिले. यामधे प्रजेला पिण्यासाठी पाणी,जगाच्या पोशिंद्याला शेतीसाठी सिंचन व्यवस्था निर्माण केली.तसेच जिजाऊंचे प्रत्येक क्षेत्रातील तसेच विशेषतः शेतकऱ्यांसाठीचे मोठे योगदान हे नाकारता येणार नाही.आणि जिगावं हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्यामुळे या प्रकल्पाला राष्ट्रमाता जिजांचे नाव देणे गरजेचे आहे.जेणेकरून जिजाऊंचे माहेर बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक ओळख मिळेल. अशी आम्ही मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून मागणी करत आहोत.या आशयाचे निवेदन मराठा पाटील युवक समितीच्या वतीने तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी मराठा पाटील युवक समितीचे डॉ शरद पाटील -जिल्हा कार्याध्यक्ष,छोटू पाटील जिल्हा उपाध्यक्ष,लक्ष्मण वक्टे तालुका अध्यक्ष,अशोकराव घनोकार,प्रकाश खंडागळे,अमर पाटील,शंकर कोळसकार,मनोज वकटे,भगवान धांडे,सागर मुंढे,अनिकेत भगत,आनंद मुंढे,विलास वकटे,राहुल मुंढे,वैभव पाटील,अजय पाटील,अरुण चवरे,किरण मिरगे,एम एन पाटील,विजय गावंडे,शिवाजी क्षीरसागर उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here