Home Breaking News गणेशोत्सवही होईल शानदार, बाप्पाच्या दिमतीला मोदक लज्जतदार!

गणेशोत्सवही होईल शानदार, बाप्पाच्या दिमतीला मोदक लज्जतदार!

आप्पाजी डेअरी प्रोडक्टने वाढविला सण उत्सवाचा ‘गोडवा!’

खामगाव : सण-उत्सव यातील मांगल्य – पावित्र्य आणि परंपरागत पूजाविधी लक्षात घेता आप्पाजी डेअरी प्रोडक्टकडून विविध पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या उपक्रमामुळे सण उत्सवातील गोडवा वाढला असून आता गणेशोत्सव सुद्धा शानदार होणार आहे. त्यासाठी आप्पाजी डेअरी प्रोडक्टने गणपती बाप्पा व त्यांच्या भक्तांसाठी खास विविध प्रकारचे फ्लेवर असलेले लज्जतदार मोदक बनवले आहेत. त्यास ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

‘मोदक’ हे नाव ओठांवर आलं की जिभेला लगेचच पाणी सुटते; लाडक्या बाप्पाच्या खास आवडीचा हा पदार्थ. ही बाब लक्षात घेवून
यावर्षी खामगाववासीयांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याकरिता आप्पाजी डेअरी प्रोडक्टने पुढाकार घेतला आहे. बाप्पाच्या दिमतीला विविध लज्जतदार मोदक विक्री साठी उपलब्ध केले आहेत. खामगाव बुलढाणा रस्त्यावर गोंधनापूर येथे आपाजी डेअरी फार्मची यावर्षी सुरुवात करण्यात आली. येथील शुद्ध आणि ताजे दूध, दही, पनीर, चीज, बटर आणि विविध दुग्धजन्य पदार्थ सोबतच रसमालाई, रबडी, पेढे, बर्फी यासह नानाविध प्रकारच्या चवदार आणि शुद्ध मिठाई ग्राहकांना आकर्षित करत आहेत. १५ ऑगस्टला ‘तिरंगा बर्फी’, रक्षाबंधनला ‘बंधन बर्फी’ आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला खास ‘माखन’असे विविध उत्सवांचा आनंद द्विगुणित करणारे पदार्थ आप्पाजी डेअरी प्रोडक्टने ग्राहकांना दिले आहेत. आता गणेशोत्सवामध्ये सुद्धा विविध मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

नैवेद्याची गोडी वाढविणार ६ प्रकारचे मोदक

खास गणेशोत्सवानिमित्त आप्पाजी डेअरी प्रोडक्ट गांधी चौक खामगाव येथे विविध ६ प्रकारचे लज्जतदार मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये रोज, चॉकलेट, व्हॅनिला, पिस्ता, मॅंगो,खस व केशर असे विविध चवीचे मोदक बनवण्यात आलेले आहेत. हे मोदक बाप्पाच्या नैवेद्याची सोबतच या उत्सवात भाविकांना वितरित केल्या जाणाऱ्या प्रसादाची गोडी नक्कीच वाढवतील असे मत आप्पाजी डेअरी प्रोडक्टचे संचालक व्यक्त करत आहेत.

पहा व्हिडिओ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here