Home वुमन स्पेशल शिक्षक दिनानिमित्त जायंट्स सहेली ग्रुपतर्फे प्राध्यापिका सौ.आचल ठाकूर सन्मानीत

शिक्षक दिनानिमित्त जायंट्स सहेली ग्रुपतर्फे प्राध्यापिका सौ.आचल ठाकूर सन्मानीत

 

खामगांव: जी.वी.मेहता नवयुग विद्यालय खामगांव येथे कार्यरत असलेल्या प्राध्यापिका सौ.आचल ठाकूर यांचा शिक्षक दिनानिमित्त जायंट्स सहेली ग्रुप खामगांव यांच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला. 5 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षक दिनानिमित्त जायंटस् इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंटस सहेलीग्रुपच्या अध्यक्षा नीला अग्रवाल होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. सुरजितकौर सलुजा, सौ.गिता बयस व जायंटस् सहेली ग्रुपच्या सदस्यांची उपस्थिती होती.

प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अतिथींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे असलेले महत्व याबदद्ल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापिका सौ.आचल ठाकूर यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच, नैतीक मुल्य आणि संस्कार किती आवश्यक आहे याबदद्लचे महत्व विषद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण हा मुख्य घटक डोळयासमोर ठेवून उच्च शिक्षण आत्मसात करावे व त्यातून आपली व आपल्या परिवाराची प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गीता बयस यांनी तर आभार प्रदर्शन रेखा केजडीवाल यांनी मानले.

———-

द रिपब्लिक अपडेट्स दैनिकाचा अंक, बातमी आणी जाहीराती करिता संपर्क : 9423237001.. ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या www.therepublic.co.in या वेबसाईटवर भेट द्या ! तसेच आमच्या The Republic Updates  या युट्यूब न्युज चॅनल ला लाईक, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी बेल आयकॉनला  प्रेस करायला विसरू नका!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here