Home Breaking News येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुफलाम ; बुलडाणा वासीयांची पाणी समस्या मिटली!

येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुफलाम ; बुलडाणा वासीयांची पाणी समस्या मिटली!

येळगाव धरण 100 टक्के भरले

बुलडाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

बुलडाणा

मंगळवार 7 सप्टेंबरच्या रात्री पासून सुरू झालेल्या पावसाने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत करुन ठेवले होते. जिल्हयात तेराही तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने सर्व नदी नाले दुथळी भरुन वाहिले. यातच आज 08 सप्टेंबर रोजी बुलडाणा शहराला पाणी पुरवठा करणारे स्व. रा.दे. भोंडे सरकार जलाशय पुर्णत: शंभर टक्के भरले असून बुलडाणे करांची वर्ष भराची पिण्याची पाण्याची चिंता दुर झाली आहे. तर धरण शंभर टक्के पुर्ण भरण्याची बातमी शहरात माहित पडताच पाहणा-यांची गर्दी धरणाकडे वाढली आहे.

बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शहराची पुढील वर्षभराची चिंता मिटली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढू शकते त्यामूळे धरणाच्या पातळीमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे येळगाव धरणाच्या गोडबोले सांडव्यातून विसर्ग होऊ शकतो. येळगाव धरणातून बुलडाणा शहरासह तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. पुढील एका वर्षासाठी बुलडाणा तसेच लगतच्या गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलीय. येळगाव धरणात जवळपास 100 टक्के जलसंचय झाला असून पाणी गोडबोले गेट पर्यंत पाणी येऊन ठेपले आहे. बुलडाणा शहरातील लोकसंख्येचा विचार केला असता शंभर लिटर प्रमाणे दररोज सत्तर लाख लिटर्स पेक्षा जास्त पाण्याची गरज शहरवासियांना आहे. तर येळगाव धरणातून अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी बु., सागवन, कोलवड, देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर, अंत्री तेली, जांभरुण या गावांना यळगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. याधरणातून दररोज नव्वद लाख लिटरपेक्षा जास्त पाण्याची उचल होते. धरणाची पाणी साठवण क्षमता 12.40 दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुफलाम झाले आहे. धरण क्षेत्रातील वरच्या बाजूस सागवन, नांद्राकोळी, दहिद, देऊळगाव आदी परिसरात दमदार पाऊस झाल्यास धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ होते. या परिसरात चांगला पाऊस झाल्यास पैनगंगा नदीला पूर येतो. या नदीच्या पुरामुळे मागिल तीन, चार वर्षात धरण पहिल्याच पावसात भरुन ओव्हर फ्लो झाले होते. काल रात्री पावसाने विश्रांती घेतल्यामुळे प्रवाह कमी झाला अन्यथा आज सकाळी धरण ओव्हरफ्लो झालेले असते. तरीही यानंतर पडणारा पाऊस धरण भरून वाहणार आहे. दरम्यान,धरणातून विसर्ग सुरू केल्यानंतर व नदीला पूर आल्यानंतर नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here