Home Breaking News पोटची मुलगी व पुतण्याने केला जन्मदात्या बापाचा केला खून

पोटची मुलगी व पुतण्याने केला जन्मदात्या बापाचा केला खून

 

मलकापूर येथील सुभाष चंद्र बोस नगर मधील घटना

घरघुती वादातून घडली घटना, दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उल्हास शेगोकार

मलकापूर : मुलीचे तीन वेळा लग्न करून देऊनही पुन्हा संसार मोडून वडिलांच्या घरी परत येण्याच्या अंदाजावरून वडिलांनी घरात घेण्यास नकार दिल्याने चुलत भावा सोबत संगनमत करून सख्ख्या मुलीने वडिलाची धारदार शस्त्राने हत्त्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात उघडकीस आली आहे… याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगी आणि चुलत भावाला अटक केलीये…
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोस नगर मधील गुलाब रावणचवरे या 55 वर्षीय गृहस्थांनी आपल्या लक्ष्मी नामक मुलीचे तीन वेळा लग्न करून देऊनही ती संसार करीत नसल्याने त्याच्यावर नेहमी रागावत होते… यामध्ये मुलगी सौ लक्ष्मी हरिचंद्र सरीसेराव ही अमरावती येथून मलकापूर येथे पोहोचून वडिलांच्या घरात पुन्हा राहण्याचे प्रयत्न करीत असताना वडिलांसोबत रात्री दहाच्या सुमारास वाद झाले, यावेळी मुलगी सौ लक्ष्मी हिने किचन मधील लोखंडी सुरी घेऊन वडिलांच्या अंगावर धावत गेली, याच दरम्यान चुलत भाऊ प्रकाश साहेबराव रावणचवरे याने लक्ष्मी च्या हातातील सुरी स्वतःकडे घेऊन सख्खे काका गुलाब रावणचवरे यांच्या छातीत खूपसून ठार केले… घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले, या प्रकरणी मृतकाच्या 12 वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here