Home Breaking News ‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन...

‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए’ ; न्यायालयाने क्लिन चिट दिल्यावर ना. छगन भुजबळ यांचा शायराणा अंदाज

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं, असं सांगताना या सगळ्या प्रकरणानंतर आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही…. कोणावरही लोभ नाही, असंही ते म्हणाले.

कंत्राटदाराला एक फूटही एफएसआय मिळाला नाही… आमच्यावर खोटे आरोप लावण्यात आले… यासगळ्या प्रकरणात विनाकारण मला तुरुंगवास सोसावा लागला. पण गणेशोत्सच्याआधी आमच्यावरचं संकट दूर झालं… सत्य परेशान हो सकता हैं… लेकीन पराजित नही…, असं भुजबळ म्हणाले. साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए…. ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…. अशी शेरेबाजी करत भुजबळांचा पुन्हा एकदा शायराना अंदाज दिसून आला. “तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे… त्यांनी कितीही कटकारस्थान केलं तरी थोटामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावरटं विघ्न दूर झालं… पवारसाहेबांचे आभार…. जयंतराव-अजितदादांचे आभार… मला मंत्रिमंडळात घेतलं, उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार भुजबळ यांनी मानले.


तुरुंगात जावं लागल्याचं दु:ख आहे पण किती वेळ दु:ख उगाळत बसायचं… दरम्यानच्या काळात मला, माझ्या कुटुंबाला, छोट्या लेकरांना खूप त्रास झाला पण आपल्या सगळ्यांचं किती आयुष्य आहे… कशाचा कुणाचा द्वेष करायचा…. म्हणून माझ्या मनात कुणाबद्द्ही द्वेष नाही… राग नाही, असंही भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत. या प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला.  छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची जेलवारी झाली होती.या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना दोषमुक्तता करण्यात आलं आहे.  तेव्हा ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

आमचं सरकार असल्यामुळे माझी सुटका झाली असं नाही तर माझ्या वकिलांनी माझी न्यायालयात तगडी बाजू मांडली… माझा न्यायदेवतेवर विश्वास होता… अखेर न्यायदेवतेने निर्णय दिला… माझ्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे, असं भुजबळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here