Home जळगाव जामोद तालुका दुसऱ्या दिवशीही जळगाव जामोद-नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद पुर्णेच्या पुलावरून वाहतय...

दुसऱ्या दिवशीही जळगाव जामोद-नांदुरा मार्ग वाहतुकिसाठी बंद पुर्णेच्या पुलावरून वाहतय आठ ते दहा फूट पाणी

 

जळगाव जा : पुर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने माणेगाव-येरळीच्या मधोमध असलेल्या पुर्णा नदिच्या पुलावरून आठ ते दहा फूट पाणी वाहत असल्याने आज सलग दुसऱ्या दिवशीही जळगाव जामोद-नांदुरा मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस सुरू असून लहान मोठ्या नदी-नाल्यांना पूर आलेला आहे.पुर्णा नदिचा उगम मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगरातून झाला असून नदिच्या उगमस्थानावरही पावसाची संततधार सुरूच आहे.पुर्णा नदी अमरावती,अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून जात असून जळगाव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र मुक्ताबाई येथे तापी नदीला येवून मिळते.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यलगत असलेल्या अमरावती, अकोला जिलह्यातही जोरदार पाऊस सुरू असून तीकडल्या नदी – नाल्यांचा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात पुर्णेच्या नदि पात्रात होत आहे.अकोला-बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या वारी हनुमान धरनातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्या जात असल्याने पुर्णेच्या नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे.त्यामुळे पुर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे.तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील हतणूर धरणाचे सर्वच वक्रद्वार पुर्ण क्षमतेन उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.एकंदरीतच नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्याने पुर्णा नदीला मोठा पूर आला असून माणेगाव येरळी जवळील पुलावरून आठ ते दहा फूट पाणी वाहत आहे…काल सकाळपासूनच पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पुर्णतः बंद झाली आहे.लोकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये, कोणताही अनुचित प्रकार त्याठिकाणी घडू नये यासाठी जळगाव जामोदचे ठाणेदार सुनील अंबुलकर साहेब लक्ष ठेवून असून पोलीस प्रशासनाचे कर्मचारी कालपासूनच पुर्णा नदीपात्राजवळ बंदोबंदस्थासाठी हजर आहेत.नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होत असून नदिकाठावरील गावांना सर्तकतेचा ईशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here