Home Breaking News Big Breaking ! ‘या’ कारणास्तव शेतकऱ्यांचा विमा रोखल्याची रिलायन्स कडुन कबुली!!

Big Breaking ! ‘या’ कारणास्तव शेतकऱ्यांचा विमा रोखल्याची रिलायन्स कडुन कबुली!!

 

राहुल निर्मळ
जळगाव (जा.)(:बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील ४५ हजार २५२ शेतकऱ्यांचे ६४ कोटी ७ लक्ष २१ हजार रुपये मंजूर असुनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरीत होण्यास विलंब होत असल्याने मा.खा.राजु शेट्टी व स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी सहकाऱ्यांसह ७ संप्टेबर रोजी थेट पुणे येथिल रिलायन्स कंपनी कार्यालयवर धडक दिली आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील सोयाबीनचा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वळती करण्याचे काम कंपनी कडून सुरु करण्यात आले होते.पंरतु बुलडाणा जिल्ह्यातुन काही हरकती आल्याने विमा रक्कम वळती करणे थांबवण्यात आले‌ असल्याचे कंपनी कडून सांगण्यात आले.त्या वेळी राजु शेट्टी यांनी कंपनीला विदर्भातील शेतकऱ्यांची मागिल वर्षाची विदारक परिस्थितीची जाणीव करून देत. शेतकऱ्यांना वेठीस न धरता आणी विमा प्रश्नाला राजकीय स्वरूप न देता संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यातील ६४ कोटी ७ लक्ष २१ हजार रुपये पिक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करा. अन्यथा कोणत्याही क्षणी अंबानीच्या ॲन्टालिया या बंगल्यावर मोर्चा काढू असा सज्जड इशारा राजु शेट्टी यांनी कंपनिच्या वरीष्ठ अधिकाऱ्यान सोबत बोलतांना विमा कंपनीला दिला आहे.
गेल्या दिड वर्षापासून मराठवाडा व विदर्भातील लाखो शेतकरी पिकविमा रक्कमेपासून वंचित आहेत.रिलायन्स कंपनीमध्ये शेतकर्यांनी प्रामाणिकपणे पिकविम्याचा हप्ता भरूनही विमा रक्कम न मिळाल्याने अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकर्यांना लुबाडून हजारो कोटीचा नफा मिळवून अंबानी जगातील १ नंबरचे श्रीमंत होतील स्वत:च्या मुलीच्या लग्नात शेकडो कोटीचा चुराडा करून दुस-याचे संसार उघड्यावर पाडणा-या अंबानीना आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबाचा तळतळाट लागणार हे नक्की !
या वेळी मा.खा.राजु शेट्टी यांचे समवेत स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, सावकार अण्णा मादनाईक,बाप्पुसाहेब कंराडे, रोशन देशमुख,तेजराव लोणे, गजानन पवार,विठ्ठल महाले, सुमित देशमुख,सुनिल आरीकर सह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here