Home Breaking News जिल्ह्यात संततधार कायम…! असा आहे आज तालुकानिहाय पाऊस आणि धरणांमधील जलसाठा

जिल्ह्यात संततधार कायम…! असा आहे आज तालुकानिहाय पाऊस आणि धरणांमधील जलसाठा

सरासरी 26.4 मि.मी पावसाची नोंद
• मोताळा तालुक्यात सर्वात जास्त 61.5 मि.मी पाऊस
बुलडाणा,  दि.8 : जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाने आपली हजेरी लावली. काही तालुक्यांमध्ये त्याची जोरदार बॅटींग अनुभवयाला आली, तर काही ठिकाणी विश्रांती घेत पाऊस बरसत होता. पावसाने आपली संततधार कायम ठेवत सरासरी 26.4 मि.मी नोंद केली.
जिल्ह्यात मोताळा तालुक्यात सर्वात जास्त 61.5 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 26.4 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची. बुलडाणा : 50.7 मि.मी (653.2), चिखली : 12.8 (606.3), दे.राजा : 28 (584), सिं. राजा : 21.2 (766.5), लोणार : 20 (758.3), मेहकर : 16.8 (928.3), खामगांव : 22 (587.3), शेगांव : 15.3 (391.8), मलकापूर : 28.9 (461.1), नांदुरा : 29.5 (474.8), मोताळा : 61.5 (523.2), संग्रामपूर : 22.5 (519.9), जळगांव जामोद : 14.1 (365.2)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7619.9 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 586.1 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 365.2 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 51.65 आहे.
जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 38.67 दलघमी (55.78), पेनटाकळी : 25.77 दलघमी (42.96), खडकपूर्णा : 81.20 दलघमी (86.94), पलढग : 3.39 दलघमी (45.14), ज्ञानगंगा : 27.28 दलघमी (81.29), मन : 35.24 दलघमी (95.70), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 8.17 दलघमी (54.36), तोरणा : 4.78 दलघमी (60.65) व उतावळी : 19.79 दलघमी (100).
100 टक्के भरलेले लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प
जिल्ह्यात 100 टक्के भरलेले लघुपाटबंधारे प्रकल्प : देऊळगांव कुंडपाळ ता. लोणार, गुंधा ता. लोणार, तांबोळा ता. लोणार, कंडारी ता. नांदुरा, घनवटपूर ता. मेहकर, मिसाळवाडी ता. दे.राजा, अंचरवाडी -1 ता. दे. राजा, अंचरवाडी -2 ता. दे. राजा, टाकळी ता. खामगांव, निमखेड ता. खामगांव, पांगरखेड ता. मेहकर, कळमेश्वर ता. मेहकर, चायगांव ता. मेहकर, टिटवी ता. लोणार, शिवणी जाट ता. लोणार, गांधारी ता. लोणार, पिंपळनेर ता. लोणार, गारखेड ता. सिं.राजा, विद्रुपा ता. सिं.राजा. मध्यम प्रकल्प : मध्यम पाटबंधारे प्रकल्प दुर्गबोरी ता. मेहकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here