Home Breaking News जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयासमोर नंदलाल भट्टड यांचे लाक्षणिक उपोषण

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयासमोर नंदलाल भट्टड यांचे लाक्षणिक उपोषण

उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय खामगाव येथे सुरू आहे अंदाधुंद कारभार 

खामगाव येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सर्रासपणे गैरकारभार सुरू आहेत. धनगड्यान साठी सर्व नियम ढाब्यावर ठेवून जनसामान्यांना त्यांच्या कामासाठी कायद्याची चौकट दाखविण्यात येते. खामगाव येथील नजूल शीट नं. ३५, प्लॉट नं.८ मधील काही भागावर शहरातील धनागडे मध्ये गणल्या जाणारे समीर संचेती, प्रमोद अग्रवाल, विनय अग्रवाल, चंद्रकांत संघवी, यांनी कोणतेही अकृषक आदेश न घेता मनात आल्यासारखे नकाशे तयार करून राजकीय वजन वापरून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सन २००७ मध्ये फक्त नकाशाच्या आधारे मोजणी करून मोजणी शीटवर तब्बल १ ते १६ प्लॉट ची नोंदणी करून घेतली. यासाठी फक्त त्यांनी शासनाच्या तिजोरीत मोजणी फी म्हणून ९०००/- रुपयांचा भरणा केला. अर्थात या धनगड्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून २९००० चौ. फूटचा लेआउट फक्त ९०००/- रुपयांमध्ये तयार करून घेतला व शासनाच्या इतर विभागाला लाखो रुपयांचा चुना लावला. याच मोजणी शीट च्या आधारे आता तब्बल १३ वर्षानंतर मार्च महिन्यात एकाच आखीव पत्रिकेवर अर्थात नमुना ड वर १ ते १६ प्लॉटची नोंद करून घेतली व या नमुना ड च्या आधारावर आता या धनागड्यांना प्लॉट विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र सदर प्रकरण माझ्या लक्षात आल्याबरोबर मी याचे संपूर्ण दस्तावेज काढून संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या, या प्रकारामुळे मा. मुख्याधिकारी, न. प खामगाव यांनी २७ जुलै २०२१ रोजी सदर नोंद रद्द करण्या करिता उपअधीक्षक, भूमी अभिलेख खामगाव यांना पत्र सुद्धा दिले. मात्र भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या खरोटे उपअधीक्षक भूमी अभिलेख खामगाव यांनी त्याचीही दखल घेतलेली नाही.

सदर जागेवर नगरपालिकाचे आरक्षण क्रमांक ५२, टाउन सेंटर म्हणून आरक्षित आहेत. असे असतानाही संबंधितांनी लेआऊट करून घेतले व याला पूर्ण सहकार्य नझुल विभाग खामगावचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे. तरी सदर गैररित्या झालेली नोंद रद्द करण्यात यावी व संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी यासाठी नंदलाल भट्टड आज दि. ८/९/२०२१ रोजी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, बुलढाणा समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here