Home Breaking News जळगाव जामोद – नांदुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद; पुर्णा नदीच्या पुलावरून चार ते...

जळगाव जामोद – नांदुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद; पुर्णा नदीच्या पुलावरून चार ते फूट पाणी!

 

जळगाव जा:(सागर झनके ) आज सकाळी पुर्णा नदिला पूर आल्यामुळे माणेगाव येरळीच्या मधोमध असलेल्या पुर्णा नदिला पुर आल्यामचळे सदर पुलावरुन चार ते पाच फूट पाणी असल्यामुळे जळगाव जामोद – नांदुरा मार्ग आज सकाळपासूनच वाहतुकिसाठी बंद झाला करण्यात आला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून बुलढाणा जिल्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तर काही भागात ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नदि नाल्यांना पूर आलेला आहे…पुर्णा नदीच्या उगमस्थानावरही पावसाची संततधार सुरू आहे.लहान मोठी धणेही पाण्याने तुडुंब भरलेले असल्यामुळे त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे नदिपात्रात पाण्याची मोठी वाढ होत असून नदिला मोठा पूर आलेला आहे.आजरोजी पुर्णा नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून चार ते पाच फूट पाणी सद्ध्या वाहत आहे.त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे.

जुन्या पुलाच्या बाजुलाच नदिवर मोठा पुल बांधला असून त्याच काम अजुनही अतीशय कासव गतीने सुरू आहे.आजरोजी तो पुल सुरू असता तर प्रवाशांची गैरसोय झाली नसती.सकाळ पासूनच पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुर पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. नदिपुलावर पोलीस प्रशासनाचे कर्मचारीही त्या ठिकाणी दिसून आले नाही. अशा वेळेस पुलावर एखादा अनुचीत प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण…? पुर्णा नदिच्या पाण्यात अजूनही वाढ होत असून आता प्रयंत पुलावरून चार ते फूट पाणी वाहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here