Home Breaking News मतदार संघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे – आ आकाश...

मतदार संघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे – आ आकाश फुंडकर

खामगाव : मतदारसंघातील खामगाव तालुक्यातील निपाना येथे पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या नाल्याला प्रचंड पूर आल्यामुळे गावात व शेतात पावसाचे पाणी घुसले याबाबत कळताच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी भेट देऊन पाहणी केली यासोबतच मतदारसंघात जिथेही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी यांना दिल्या.


आज पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे निपाना गावातील नाल्यांना पूर आला व पुराचे पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये घुसले. गावाजवळील नाल्यात वाहून आलेल्या काडी कचऱ्यामुळे पाणी अडले व त्यामुळे पुराचे पाणी नाल्याबाहेर पसरून आजूबाजूच्या शेतात घुसले व शेतीचे प्रचंड नुकसान झाले.*
*सदर नाला तात्काळ मोकळा करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री पुंडकर याना आदेश देण्यात आले व सदर नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना उपविभागिय अधिकारी खामगाव यांना केल्या.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दरम्यान नायब तहसीलदार नेमाने,मंडल अधिकारी, तलाठी, राजाराम पाटील,लाला महाले, विनोद टिकार, समाधान मुंढे, संतोष पाटील, इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. तसेच मतदारसंघात इतर ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झाल्यास त्या ठिकाणची सुद्धा पाहणी करून पंचनामा करण्यात यावे अशा सूचना उपविभागीय अधिकारी यांना आमदार आकाश फुंडकर यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here