Home Breaking News तडीपार आरोपीचा खामगावात डेरा ; पोलिसांनी जुगारात पकडून जामीनवर सोडले!

तडीपार आरोपीचा खामगावात डेरा ; पोलिसांनी जुगारात पकडून जामीनवर सोडले!

जुगार खेळताना पकडले; जामिनावर सोडल्यानंतर आरोपीची शोधाशोध

खामगाव: सहा महिन्यांसाठी तडीपार असलेल्या आरोपीला जुगार प्रकरणात जामीन देणे शिवाजी नगर पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले. प्रकरण अंगावर शेकत असतानाच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे शिवाजी नगर पोलिस स्टेशनमधील जुगार प्रकरणी ‘गडबड घोटाळ्या’वर शिक्कामोर्तब होत असल्याची चर्चा आहे.

I
स्थानिक शिवाजीनगर पोलिसांनी २ सप्टेंबरच्या रात्री ११:३० जनुना शिवारातील रेणुका नगर परिसरातील एका जुगारावर छापा टाकला. यामध्ये जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आलेल्या १९ आरोपीला अटक करण्यात आली. तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या जुगार प्रकरणी काही आरोपींना सोडण्यात आल्याची चर्चा असतानाच  किसन भगतपुरे या आरोपीला जामीनावर सोडले. दरम्यान, तडीपार असलेल्या भगतपुरेच्या बाबतीत पोलिस इतके निष्काळजी कसे? असा प्रश्न उपस्थित झाला. शिवाजी नगर पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे वरिष्ठांच्याही हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे दिसताच दोन दिवस शोध मोहिम राबवून किसन भगतपुरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर जालना जिल्ह्यात सोडून देण्यात आले. तत्पूर्वी त्याच्यावर आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्यात आली. तडीपार असलेला किसन भगतपुरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात विविध पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे चार महिन्यांपूर्वीच त्याला खामगावातून तडीपार घोषित करण्यात आले. मात्र, तरीही त्याचा खामगावातच वावर असल्याने शिवाजी नगर पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दोन-दिवस पाळत ठेवून अटक!
– जुगार प्रकरणात जामीन देण्यात आलेला आरोपी रेकॉर्डवर तडीपार असल्याचे निदर्शनास येताच. शिवाजी नगर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. आधीच गडबड घोटाळ्याने चर्चेत आलेल्या शिवाजी नगर पोलिसांच्या हे प्रकरण चांगलेच अंगलट आहे. त्यामुळे शिवाजी नगर पोलिसांनी सलग दोन दिवस पाळत ठेवून ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अटक केली.

विश्वासात घेऊन कारवाई!
– तडीपार प्रकरणातील आरोपी  सुरूवातीला जुगार खेळताना आढळून आला. पोलिसांनी अतिशय हलगर्जीपणातून त्याला जामीनही दिला. दरम्यान, तडीपार असलेल्या आरोपीचा खामगावात वावर कसा?, आरोपीला जामीन दिलाच कसा? असे विविध प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर शिवाजी नगर पोलिसांच्या पथकाने किसन रामा भगतपुरे याच्यावर विश्वासात घेऊन कारवाई केल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here