Home क्राईम चारित्र्यावर संशय घेऊन तलाठ्याने केला डॉक्टर पत्नीचा हातोडा आणि चाकूने निर्घृण खून

चारित्र्यावर संशय घेऊन तलाठ्याने केला डॉक्टर पत्नीचा हातोडा आणि चाकूने निर्घृण खून

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी भागातील युथोपीया सोसायटीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम विवाह केलेल्या तलाठी पतीने आपल्या डॉक्टर असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्घृण हत्या केली आहे. विजयकुमार साळवे या तलाठी पदावर कार्यरत असणाऱ्या आरोपीने आपली डॉक्टर असलेली पत्नी सरला विजय साळवे हिची निर्घृण हत्या केली आहे. सरला गाढ झोपेत असताना विजय कुमार याने हतोडा आणि चाकूने तिचा निर्घृण खून केला. विजय कुमार याने फरार होण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे.

सॉरी मला माफ करा मी सरला वर जीवापाड प्रेम करत होतो. मात्र मागील एक-दोन महिन्यापासून ती माझ्याशी नीट वागत नव्हती. तिच्या अशा वागण्याने नेहमी आमच्यात वाद होत असत. त्यामुळे मी हे चुकीचे पाऊल उचलण्यास भाग पडलोय! माझा शेवट देखील कसा होईल हे मला माहित आहे मला माफ करा. अशी विनवणी विजयकुमार ने आपल्या नातेवाईक आणि मित्रांना केली आहे.

जवळपास दोन वर्षांपूर्वी विजयकुमार आणि सरला यांचा प्रेम विवाह झाला होता. सरला साळवे पुण्यातील नायडू रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. तर फरार तलाठी विजय कुमार हा जुन्नर तालुक्यातील आळे फाटा येथे तलाठी म्हणून कामाला आहे.  सरला आणि विजय कुमार यांनी मोशी परिसरात युटोपीया सोसायटीतील नववव्य मजल्यावर नुकतीच नवीन सदनिक खरेदी केली होती. शनिवारी त्यांनी आपल्या नवीन सदनिकेची वास्तू शांती देखिल केली होती. मात्र, शनिवारची रात्र सरला साठी काळ रात्र ठरली. याच रात्री सरला आणि विजयकुमार आपल्या नव्या सदनिकेत मुक्कामी असताना विजय कुमार याने सरलाचा हातोडा आणि चाकूने निर्घृण खून केलाय. अशी माहिती पोलिसांनी दिली.

सरला साळवे हत्या प्रकरणात भोसरी एमआयडीसी पोलिसांत आरोपी विजयकुमार साळवे  विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सरलाची हत्या करून तिच्या मृतदेहाशेजारी आरोपी विजयकुमार याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांने सरला ला ठार केल्या नंतर मी स्वतःचही जीवन संपवणार असा उल्लेख केला. एकूणच या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here