Home खामगाव तालुका तंटामुक्तीचे अध्यक्षपदी आजीम खान; हा मनोदय केला व्यक्त

तंटामुक्तीचे अध्यक्षपदी आजीम खान; हा मनोदय केला व्यक्त

 सहदेव वाकोडे / विशेष प्रतिनिधी
लाखनवाडा : लाखनवाडा येथे नुकतेच ग्रामसभा संपन्न होऊन लाखनवाडा तंटामुक्ती च्या अध्यक्षपदी युवा नेते आजीम खान यांची निवड करण्यात आली आहे.

अजीम खान गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात आग्रही असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करतात ते भारिप बहुजन महासंघाचे तालुका उपाध्यक्ष देखील आहे त्यांच्या निवडीमुळे त्यांचे चाहत्या वर्गात आनंदाचे वातावरण झाले आहे.

अभियानाचे उदिष्ट

O

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्त्वात आले आहे. हा महाराष्ट्र शासन अधिकृत प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली.गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे.

विकासाला चालना देणार

जातीय सलोखा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आजीम खान नेहमी सक्रिय असतात त्यांची निवड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे या पदाला न्याय देऊन गावात चांगली कामे तसेच जातीय सलोखा बंधुभाव कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे अजून खान यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांचा ठिकाणी सत्कार सुद्धा होत असून एका योग्य व्यक्तीला तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून गावाच्या विकासाला चालना देण्याचे देण्यासाठी प्रयत्न करू असे आजीम खान यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here