Home Breaking News मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या कथित पोलिसाच्या कानाखाली आ. गायकवाड यांनी काढला ‘आवाज’

मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या कथित पोलिसाच्या कानाखाली आ. गायकवाड यांनी काढला ‘आवाज’

बुलढाणा : मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या तथाकथित पोलिसांमुळे ट्राफिक जाम झाली तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलढाणा कडे जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सदर पोलिसाला कानाखाली वाजवली अन् पोलीस लिहिलेली पाटी आलेल्या कार मध्ये बसून मद्यपी पोलिसांनी पळ काढला. सदर प्रकार देऊळगाव मही नजीक सरंबा फाट्यावर आज सायंकाळी सहाच्या सुमारास घडला असून या प्रकाराची जोरदार चर्चा आहे. आपल्या वाहनावावर पोलीस अशी पाटी लावून धुडगूस घालणारे हे नेमके कोण होते आणि अशी पाटी लावणे योग्य आहे का, याबाबत पोलीस विभागाने आता आता चौकशी करणे गरजेचे आहे.

कायदा सर्वानाच सारखा असतो, मात्र याचे अनेकांना भान राहत नाही. असाच प्रकार आज घडला. पोलिसांच्या नावाने काही जण रस्त्यावर नाचगाणे करत वाहतुकीची कोंडी करत होते. त्याबाबत सविस्तर असे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांना औरंगाबाद येथे रुग्णालयात भेटून आमदार संजय गायकवाड पत्रकार अजय बिल्लारी परत येत होते. देऊळगाव मही च्या सरंबा फाट्यानजीक पुढे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ठप्प झालेल्या वाहतूक इथून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध पोलीस गेलेल्या पाटी असलेली एम एच २८ ए.एन ३६४१ क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या कार समोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते.

परिणामी चिखली येथून येणारी वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती. हा प्रकार पाहून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांचा राग अनावर झाला व त्यांनी त्या तथाकथित पोलिसाला कानाखाली दोन वाजवली. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्यामध्ये मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद झाला व पोलीस लिहिलेल्या त्या ढवळ्या रंगाच्या कार मध्ये बसून त्यांनी पळ काढला बुलढाणा पासिंग असलेल्या त्या कार द्वारे नेमका कुठल्या पोलीस ठाण्यातील मद्यधुंद पोलीस प्रवास करीत होते याचा उलगडा झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here