Home Breaking News दुःखद ! खामगाव तालुक्यात तलावात एक तर नागपूरच्या कन्हान नदीत पाच जण...

दुःखद ! खामगाव तालुक्यात तलावात एक तर नागपूरच्या कन्हान नदीत पाच जण बुडाले

नागपूर : विदर्भातील नागपूर जिल्ह्यात पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका जणांचा बुडून मृत्यू झाला आहे पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे विदर्भात एकच दुःख व्यक्त होत आहे

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरगाव अडगाव येथील रहिवाशी आशुतोष निरंजन सुरवाडे हा २० वर्ष वयाचा तरुण आज पोळ्याच्या पूर्व संध्येला बैल धुण्यासाठी बोरी आडगाव येथील तलावात गेला होता. यावेळी पाय घसरून पडल्याने तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पोळा सणाच्या पूर्वसंध्येलाच युवकाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

नागपूर येथील याच नदीत तरुण बुडाले

नागपुर जिल्ह्यातील आज दुसरी  दुःखद घटना घडली आहे.नागपुरात पाच तरुण कन्हान नदीत बुडाले आहेत. नागुपरातील पारशिवनी तालुक्यात हे तरुण पोहण्यासाठी नदीत गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे तरुण बुडाले. पाचही तरुणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पथकामार्फत शोध कार्य सुरू आहे.


नदीला प्रवाह जास्त असल्या कारणाने पारशिवणीच्या तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी एसडीआरएफ पथकाची मागणी केलेली आहे. मृत तरुणांची ओळख पटली असून सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी त्यांची नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत. हे तरुण ताजुद्दिन बाबा यांच्या संदल करिता गेले होते. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्तत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here