Home शेगाव विशेष स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : विजय अंभोरे

स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसचा झेंडा फडकवा : विजय अंभोरे

शेगाव येथे सत्कार ; श्रींचे दर्शन आणि कार्यकर्त्यांशी चर्चा

शेगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर विजय अंभोरे साहेब प्रथमच 2 सप्टेंबर २०२१ रोजी संतनगरी शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.
तदनंतर स्थानिक विश्राम भवन येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून सत्कार स्वीकारला. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव जळगाव विधानसभा मतदारसंघ पक्षनेत्या
डॉ. स्वातीताई वाकेकर, जळगाव जामोद मतदारसंघातील ज्येष्ठ नेते तथा नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरूंगले, खामगाव विधानसभा मतदारसंघ पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया, तालुकाध्यक्ष विजय काटोले, माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, माजी नगरसेवक किरणबाप्पू देशमुख, ज्येष्ठ नेते गोपालभाऊ कलोरे, डॉ. जयवंतराव खेळकर
आदि पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम माजी नगरसेवक किरणबापू देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व नेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी मनोकामना व्यक्त केली.
तर नंतर खामगाव विधानसभा मतदारसंघ पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनीसुद्धा नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
रामविजय बापू बुरुंगले ह्यांनी सुद्धा आपले नेते माननीय मुकुलजी वासनिक साहेब यांचे जाहीर आभार व्यक्त केले. तसेच जळगाव जामोद मतदार संघाच्या पक्षनेते डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर ह्यांनी सुद्धा आपल्या निवडीबद्दल वासनिक साहेबांचे आभार मानले व पक्ष कार्यासाठी आपण सतत बांधिल राहू अशी ग्वाही दिली. माझी निवड म्हणजे कार्यकर्त्यांचा सन्मान आहे.
त्यानंतर नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष माननीय विजय अंभोरे साहेब यांनी अतिशय उद्बोधक मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांशी तसेच प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी ह्यांच्याशी संवाद साधून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी तन-मन-धनाने भक्कमपणे उभे राहून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थावर निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवा. पक्षाचा कार्यकर्ता जपला जावा कारण कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. आपापसातील गैरसमज दूर करून एक संघ काँग्रेस उभी करावी अशी भावना अंभोरे साहेबांनी व्यक्त केली. जळगाव जामोद मतदार संघावर तसेच येथील कार्यकर्त्यांवर माझे विशेष प्रेम व अधिकार सुद्धा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी शेगाव शहर व तालुक्यातील माटरगाव पं. स. इनायत उल्ला खान, जलंब पं. स. विठ्ठल सोनटक्के, नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, एस सी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण गवई, युवा नेते विजय वानखडे, सेवादल तालुकाध्यक्ष अनिल सावळे, शहर सरचिटणीस दिलीप पटोकार, सरचिटणीस प्रकाश शेगोकार, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पवन पचेरवाल, एस सी आघाडी शहराध्यक्ष भिकू सारवान, काशिनाथ डांगे, वरखेड सर्कलचे विजय गुरव, मिलिंद सोंडकर, प्रवीण भाऊ भोपळे, अनंता शेळके, उपसरपंच शिवाजी माळी, उपसरपंच ज्ञानेश्वर शेजोळे, प्रवीण सुरोशे, सुभाष शेगोकार, अशोक तायडे, विकी सारवान, हैदर अली, अच्छे खा, भैया जयस्वाल, नितीन जाधव आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here