Home Breaking News नगराध्यक्ष सौ.शकुंतलाबाई बुच यांच्या अपात्रतेसाठी लढा: काँग्रेसच्या पत्रकाने राजकीय वर्तुळात खळबळ!

नगराध्यक्ष सौ.शकुंतलाबाई बुच यांच्या अपात्रतेसाठी लढा: काँग्रेसच्या पत्रकाने राजकीय वर्तुळात खळबळ!

जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा उभारणार !

शेगाव,ता.४ येथील नगराध्यक्ष सौ.शकुंतलाबाई पांडुरंग बुच या अपात्रतेसाठी पात्र असल्याचा उल्लेख अमरावती विभागाचे आयुक्त यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या जबाबमध्ये केल्याने नगराध्यक्षांकडून पदाचा दुरुपयोग होत आहे, असा आरोप करत येत्या काळात यासंदर्भात काँग्रेस पक्ष रस्त्यावर व न्यायालयात लढा उभारणार असल्याची प्रतिक्रिया लेखी स्वरूपात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांकडे दिली आहे.न्यायालयात दाखल याचिका क्रमांक ११३० / २०१९ या प्रकरणांमध्ये विभागीय आयुक्त यांनी जबाब दाखल केला नगराध्यक्ष कलम ४४ (ई ) महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप अॅक्टनुसार अपात्र ठरतात असा उल्लेख केलेला आहे. हा विषय शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात जमीन अतिक्रमणाशी संबंधित असून अत्यंत गंभीर आहे. शिवाय विकास आराखडा मध्ये शहरातील सामान्य जागरिकांना न्याय मिळण्याची भावना आहे. त्यामध्ये उदाहरण म्हणजे आजही नगरपालिके समोर खळवाडी परिसरातील नागरिकांचे उपोषण सुरू आहे. याशिवाय अनेक प्रकरणे शेगाव खामगाव तसेच नागपूर उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत असे असताना नगराध्यक्षा सौ बुच या स्वतः पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या कुटुंबियांना लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे माननीय आयुक्त अमरावती यांच्या अहवालानुसार स्पष्ट होते हा प्रकार अत्यंत निंदनीय व सामान्य नागरिकांवर अन्याय करणारा आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच जनसामान्यांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. प्रकरणामुळे या शहरातील जनसामान्यांना तीव्र वेदना झालेल्या आहेत. काँग्रेस पक्ष अशावेळेस जनसामान्यांच्या पाठीशी सशक्तपणे उभा राहील व संबंधित प्रकरणी सर्व माहिती उपलब्ध करून विधीतज्ञांशी सल्लामसलत करेल. व येणाऱ्या काळात न्यायालयात व रस्त्यावर लढा उभारून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रसिध्दी पत्रकद्वारे काँग्रेसचेवतीने कळवण्यात आले.

यावर काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ. सौ. स्वाती वाकेकर, खामगाव मतदार संघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, शैलेंद्र पाटील, शहराध्यक्ष दीपक सलामपुरीया, किरणबापू देशमुख, डॉ जयंतराव खेळकर जिल्हा सरचिटणीस, कैलास देशमुख. न प विरोधीपक्ष गटनेते प्रफुल्ल ठाकरे, माजी शहराध्यक्ष बुढन जमादार, गोपाल कलोरे, शहर सरचिटणीस दिलीप पटोकार, आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here