Home Breaking News धावत्या ऑटो मध्ये निघाला अचानक साप ; ऑटो पलटी होवून एक ठार;...

धावत्या ऑटो मध्ये निघाला अचानक साप ; ऑटो पलटी होवून एक ठार; 4 जखमी

बुलढाणा, : धावत्या रिक्षात अचानक साप निघाला, परिणामी धांदल उडून ऑटो पलटी झाला. या अपघातात एकामजूराचा दुर्दैवी मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास बुलडाणा- देऊळघाट मार्गावर घडली आहे.

देऊळघाट येथील काही मजूर बुलडाणा शहरातील एका बांधकामावर कामासाठी गेले होते. बांधकामाच्या ठिकाणी दिवसभर काबाड कष्ट करून संबंधित मजूर सायंकाळी रिक्षानं आपल्या घरी परतत होते. दरम्यान एकेठिकाणी रिक्षा आदळली असता. संबंधित मजूराच्या पिशवीतून एक भला मोठा साप बाहेर आला. धावत्या रिक्षात सापाला पाहून रिक्षात एकच गोंधळ निर्माण झाला.

सुपडा कौतिकराव हिवाळे, गणेश शिवलाल बिबे, मनोज सुखदेव जाधव आणि रिक्षाचालक रशिद मिर्झा अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. या अपघातानंतर संबंधित जखमींना आसपासच्या लोकांनी तातडीनं नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संबंधित सर्वांवर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेत एका बांधकाम मजूराचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here