Home Breaking News भीक मागण्यासाठी दोन चिमुकल्यांना शंभर रुपयांच्या बाँडवर करार करून दीड लाखात विकत...

भीक मागण्यासाठी दोन चिमुकल्यांना शंभर रुपयांच्या बाँडवर करार करून दीड लाखात विकत घेतले !

 

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : भीक मागण्यासाठी दोन चिमुकल्यांना शंभर रुपयांच्या बाँडवर करार करून दीड लाखात विकत घेतले, असल्याचे समोर येत असून  ही बालकी बुलढाणा  जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील असल्याची माहिती समोर येत आहे

या घटनेची हकीकत अशी की, दोन चिमुकल्यांना सिग्नलवर भीक मागण्यासाठी अमानुष मारहाण करणाऱ्या महिलांना औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला होता. या दोघांनाही विकत घेतल्याचे तपासात आढळून आले. ही दोन्ही मुले देऊळगाव मही येथील एका कुटुंबातील असल्याची धक्कादायक माहिती कथित व्हिडिओ क्लिपद्वारे समोर आली आहे.

औरंगाबादमधील रामनगर स्थित एका घरात सहा व दोन वर्षांच्या दोन चिमुकल्यांना डांबून ठेवल्याचे व दोन महिला त्यांना अमानुषपणे मारहाण करीत असल्याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात आले. तिने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमाने ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचविली. मुकुंदवाडी (औरंगाबाद) पोलिसांनी त्या महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. त्यांनी दोन्ही मुलांना दत्तक घेतल्याचे सांगितले. मात्र त्यांना पोलिसी खाक्‍या दाखविला असता औरंगाबाद महामार्गावरील सिग्नलवर भीक मागण्यासाठी या दोन्ही चिमुकल्यांना शंभर रुपयांच्या बाँडवर करार करून दीड लाखात विकत घेतल्याचे उघडकीस आले आहे.

मात्र, पीडित सहावर्षीय बालकाने रामनगर येथील नागरिकांसमोर आरोपी महिलांच्या क्रूरतेची हकीकत सांगितली. तो सांगत असतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. ती ऐकून अंगावर शहारे येतात. वायरल झालेल्या या व्हिडिओत पीडित बालकांची आई देऊळगाव मही येथे, वडील राजस्थानात, तर आजी-आजोबा अकोला येथे राहत असल्याचे हा मुलगा स्वतःच्या नावासह सांगतो.

 

भीक मागण्यासाठी आम्हाला एक म्हातारी व एक महिला अमानुषपणे मारहाण करते व भिक मागितली नाही तर मारून टाकण्याची व कोरोनात मुले मेल्याचे तुमच्या आईवडिलांना सांगू, अशी भीती दाखवतात, असेही या बालकाने या व्हिडिओत सांगितले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची बुलडाणा जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापपावेतो, औरंगाबाद पोलिसांकडून देऊळगावराजा पोलिसांशी संपर्क साधण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here