Home बुलडाणा भाजपा ओबीसी आरक्षण बहाल होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- चंद्रकांतदादा पाटील

ओबीसी आरक्षण बहाल होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही- चंद्रकांतदादा पाटील

खामगांव –दि.04 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील हे खामगांव येथे आले असता त्यांचा खामगांव नगर परिषदेत सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना मा.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, नगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज रहा, परंतु राज्यातील ओबीसींचे रदद झालेले आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही.
खामगांव येथे नगर परिषदेत सत्कार प्रसंगी बोलतांना आ.चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, खामगांव नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात कोटयावधीची कामे करण्यात आली आहे. आज खामगांव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यामुळे येत्या काळात खामगांवकर जनता नगर पालिकेत भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता देईल असा विश्वास आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडणुकीसाठी सज्ज रहा. परंतु रदद झालेले ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. ओबीसींचे आरक्षण बहाल न होता निवडणुका घेतल्यास तो ओबीसींवर अन्याय होईल त्यामुळे ओबीसींचे आरक्षण बहाल होईपर्यंत कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये असे ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले.
खामगांव शहराच्या विकासासाठी राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने कोटयावधी रुपयांचा निधी दिला. खामगांव शहराचा भरपूर विकास झाला पंरतु अजून खुप काही करण्यासारखे आहे. ज्यामध्ये बचत गटासाठी स्वतंत्र मार्केट स्थापन करणे, आज शहरात असंख्य बचत गट आहेत. परंतु या बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तु, खाद्य पदार्थ, कला कौशल्य हे विकण्यासाठी त्यांच्याकडे बाजारपेठ नाही. या बचत गटांसाठी खामगांव नगर पालिका हददीत स्वतंत्र बाजारपेठ स्थापन केल्यास त्यांच्या उत्पादनाला भाव मिळून त्यांची आर्थीक परिस्थिती सुधारेल व त्यातुन बचत गट स्थापन करण्याचा उददेश्य साधला जाईल.
नगर परिषद खामगांव येथे मा चंद्रकांतदादा पाटील यांचे आगमन झाले असता महिला नगर सेविकांनी त्यांना ओवाळून औक्षवण केले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन केले.


त्यानंतर नगर पालिका पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चंद्रकांत दादा पाटील यांचा श्री विठठल रुख्माईची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा, गटनेते, सर्व सभापती व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here