Home Breaking News रस्त्याच्या कडेला दोघे बेशुद्ध; नागरिकांनी वेळीच रुग्णवाहिका बोलावून उपचारार्थ हलवलं

रस्त्याच्या कडेला दोघे बेशुद्ध; नागरिकांनी वेळीच रुग्णवाहिका बोलावून उपचारार्थ हलवलं

जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्र जवळ दुचाकी वाहनाचा भीषण अपघात

अपघातातील जखमींवर खामगाव येथे उपचार सुरू

दिनांक. 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडे सात वाजेला जळगाव जामोद संग्रामपूर रोड वर असलेले कृषी विज्ञान केंद्रा जवळ दुचाकीचा अपघात. घटनास्थळी कोणीच नव्हते परंतु रस्त्यावरून गावा नजीक नागरिक जात असताना दोन व्यक्ती व टू व्हीलर गाडी बे अवस्थेत पडलेले दिसून आले. अपघात घडला त्या ठिकाणाहून जात असलेल्या काही नागरिकांनी घटनास्थळावर थांबून दुखापत झालेल्या व्यक्तींना विचारपूस केली सदर व्यक्ती निंभोरा या गावचे जखमी गजानन सनांशे व नंदू हरामकर असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी क्षणाचा ही विलंब न करता 108 या क्रमांकावर फोन करून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण वाहिनीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात होते. तेथे जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे. सदर व्यक्तींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here