Home Breaking News शोरूम मधून ‘धूम स्टाईल’ दोन दुचाकी लंपास!

शोरूम मधून ‘धूम स्टाईल’ दोन दुचाकी लंपास!

 

संग्रामपूर : मागील काही दिवसांपासून संग्रामपूर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून 1 सप्टेंबर च्या मध्यरात्री वरवट बकाल येथील बजाज शोरूम फोडून अज्ञात चोरट्यांनी 2 मोटारसायकल चोरून नेल्या असून 28 ऑगस्ट रोजी सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सगोडा येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण रामभाऊ राऊत याच्या शेतातील मोटारसायकल सुध्दा चोरीला गेली आहेत.


वरवट बकाल येथे मार्च 2021 पासून सोनाळा रस्त्यावर सुनील इंगळे यांनी माऊली मोटर्स नावाने बजाज चे दुचाकी शोरूम सुरू केले. 1 सप्टेंबर ला शोरूम बंद करून मॅनेजर व मालक घरी निघून गेले. 2 ऑक्टोबर च्या सकाळी 9 वाजता शोरूम चा मॅनेजर शोरूम उघडण्यासाठी गेला असता त्याला शोरूमच्या शटरचे दोन्ही कुलूप तोडून चोरट्यांनी 2 दुचाकी प्लॅटिना 110 किंमत 83 हजार आणि पल्सर 125 किंमत 1 लक्ष 11 हजार किमतीच्या चोरून नेल्याची घटना समोर आली. मॅनेजर ने शोरूम मालकाला फोन करून घटना सांगितली. मालकाने तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून पोलिसांनी पंचनामा केला पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here