Home शेगाव विशेष शेगावातील पत्रकारांचा राज्यासमोर आदर्श पायंडा; हा अभिनव उपक्रम

शेगावातील पत्रकारांचा राज्यासमोर आदर्श पायंडा; हा अभिनव उपक्रम

प्रेस क्लब शेगावचे कल्याणकारी पाऊल
पत्रकारांना वैद्यकीय व शैक्षणिक कामाकरीता तात्काळ मदत
अध्यक्ष अनिल उंबरकार यांची माहिती

शेगाव : शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांकरीता प्रेस क्लब शेगाव ने कल्याणकारी पाऊल उचलले असून आर्थिक अडचणीत असलेल्या पत्रकारांसाठी वैद्यकीय तसेच पाल्यांच्या शैक्षणिक कामाकरिता तात्काळ 5000 रू ची मदत देण्याचा निर्णय प्रेस क्लब शेगाव चे अध्यक्ष अनिल उंबरकार यांनी जाहिर केला आहे.
वृत्तपत्र क्षेत्रात काम करतांना पत्रकार बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.पत्रकार हे लोकांचे हीत जोपासण्याचे काम करतात.सातत्याने लोकांसाठी काम करत असतांना पत्रकार स्वतःच्या गरजा,कुटूंबियांच्या अडचणी, प्रगतीकडे दुर्लक्ष करतो.संकटात विचाराशिवाय पर्याय नसतो.संकटकाळात पत्रकार बांधवांना एकटेपणाची जाणीव होवू नये, त्याला आधार मिळाला पाहिजे, पत्रकार बांधवांचा अपघात झाला किवा स्वतः वा कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ 5000 ह रू ची मदत देण्यात येईल. तसेच पत्रकार त्यांच्या पाल्यांची आर्थिक अडपणीमुळे शालेय फी भरून शकत नाही किंवा शालेय साहित्य,गणवेशासाठी तात्काळ 5000 रू ची मदत प्रेस क्लब शेगाव चे वतीने देण्यात येणार आहे. दरम्यान मागील आठवड्यात पत्रकार राजकुमार व्यास यांना वैद्यकीय मदत म्हणून सहा हजार तीनशे र

सांत्वनपर भोजन व्यवस्था
शेगाव शहरातील व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या परिवारातील सदस्यांचे निधन झाल्यास संबंधित बांधवांचे घरी पहिल्या दिवशी सांत्वनपर भोजन व्यवस्था प्रेस क्लब शेगाव कडून करण्यात येणार आहे.

पत्रकार मानधन योजना
प्रेस क्लब शेगाव या संस्थेअंतर्गत पत्रकार बांधवाकरीता अल्पशी मदत होण्याचे दृष्टीने पत्रकार मानधन योजना हा अभिनव उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

 

पत्रकार राजकुमार व्यास यांना मदत

पत्रकार व्यास यांना धनादेश देताना प्रेस क्लब पदाधिकारी

शेगाव येथील पत्रकार राजकुमार व्यास दुचाकी अपघातात जखमी झाल्याने प्रेस क्लब शेगाव व शेगाव तालुका पत्रकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने सहा हजार तिनशे रूपयांची मदत करण्यात आली. धनादेश प्रेस क्लब चे संस्थापक संजय सोनोने,नंदु कुळकर्णी, अविनाश दळवी यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी प्रेस क्लब अध्यक्ष अनिल उंबरकार, शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी,शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन,प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर कुकडे, धनराज ससाने, प्रदिप सनान्से यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here