Home Breaking News पीक विमा न मिळाल्यास असा राहील आक्रमक पवित्रा: जानराव देशमुख

पीक विमा न मिळाल्यास असा राहील आक्रमक पवित्रा: जानराव देशमुख

संग्रामपूर : जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे भाजपाच्या वतीने आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली आहेत पिक विम्याच्या प्रश्न बाबत 1 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आमदार डॉक्टर संजय कुटे व इतर आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात विविध मुद्दे मांडून शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली अन्यथा 15 सप्टेंबरपर्यंत पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास गोरेगाव मुंबई येथील पिक विमा कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला अशी माहिती जिल्हा भाजपा उपाध्यक्ष जानराव देशमुख व सदस्य डॉक्टर गणेश दातीर यांनी दिली कृषी मंत्री दादा भुसे यांच्या दालनात चर्चा करताना आमदार संजय कुटे यांनी सविस्तर निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत त्यांना अवगत केले यावर ना दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे आता वंचित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तरीही 15 सप्टेंबर पर्यंत पिक विमा न मिळाल्यास उपरोक्त आंदोलन करण्यात येणार आहे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सुरवातीपासूनच शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्या बाबत पाठपुरावा केला आहे तर जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत त्यांचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी इतर राजकीय नेते व संघटना सुद्धा प्रयत्न करीत आहेत त्यात शंका नाही त्यांनी ते करायलाच हवे परंतु केवळ आमच्या मुळेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे असा गवगवा करून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये अशी टीकाही जानराव देशमुख यांनी केली शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास आमदार डॉक्टर संजय कुटे गोरेगाव मुंबई येथील रिलायन्स विमा कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहे या मोर्चामध्ये मतदार संघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी व जनता मोठ्या संख्येने स्वखर्चाने सहभागी होणार असल्याचेही जानराव देशमुख यांनी सांगितले तर शेतकऱ्यांनी कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन पिक विमा लाभ पदरी पाडून घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख व डॉ गणेश दातीर यांनी केले.

पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here