Home Breaking News चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन!

चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन!

 

खामगाव: अंतर्गत रस्त्याच्या दुर्देशेवर वेधले लक्ष

खामगाव: स्थानिक बर्डेप्लॉट भागातील बिलाल मशीदीजवळील रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. याबाबत नगर पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही काहीच उपयोग न झाल्याने गुरूवारी चक्क चिखलाने माखलेल्या रस्त्यावर लोटांगण आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
खामगाव शहरातील बर्डेप्लॉट भागातील बिलाल मशीदीला जोडणाºया रस्त्यावर आणि गल्लीम मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी आणि मशीदीत नमाजसाठी जाणाºया मुस्लिम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. नगर पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यानंतरही रस्त्याच्या अवस्थेत बदल झाला नाही. त्याचवेळी  निवेदन देऊनही साधा मुरूमही या रस्त्यावर टाकण्यात आला नाही. याबाबीचा निषेध म्हणून एआयएमआयएमचे शहराध्यक्ष मो. आरीफ अ. लतिफ यांनी गुरूवारी चक्क चिखलाने माखलेल्या रस्त्यावरून लोटांगण घेतले. मो. आरीफ यांच्या लोटांगण आंदोलनामुळे बर्डे प्लॉट भागात एकच खळबळ उडाली होती. लोटांगण आंदोलनादरम्यान, पालिकेचा कोणताही अधिकारी परिसरात न फिरकल्याचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर बिलाल मशीदीकडे जाणारा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

नगर पालिकेत चिखल फेकणार!
– बर्डे प्लॉट भागात मुलभूत समस्यांचा अभाव आहे. अंतर्गत रस्त्यांसोबतच मशीदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही चिखलाचे साम्राज्य असते. याबाबत पालिका प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधण्यात येते. मात्र, प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून, लोटांगण आंदोलनाची दखल घेत रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास नगर पालिकेत चिखलफेक आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनादरम्यान देण्यात आला.

बिलाल मशीदीकडे  जाणाऱ्या पावसाळ्यात चिखल साचतो. पालिका प्रशासनाकडून या रस्त्याच्या निर्मितीकडे गत कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष केल्या जात आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी लोटांगण आंदोलन करण्यात आले.
– मो. आरीफ अ. लतीफ
शहर अध्यक्ष एआयएमआयएम, खामगाव.
——–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here