Home Breaking News दही हंडी उत्सवात पोलिसांकडून दुजाभाव – यश आमले

दही हंडी उत्सवात पोलिसांकडून दुजाभाव – यश आमले

 

खामगाव : दहीहंडी उत्सवात शहरात पोलिसांकडून दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप भाजपा जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस यश (गोलू) आमले यांनी केला आहे.

यश (गोलू) आमले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी मनाई केली होती मात्र काही मंडळांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस प्रशासन सत्ताधारी पक्षाला सूट देत असून अन्य लोकांवर मात्र बडगा दाखवून कारवाई केली जात आहे. घाटपुरी नाका परिसरात दरवर्षी आम्ही दहीहंडी उत्सव आयोजित करत असतो. परंतु यावर्षी यांच्या आदेशाने हा उत्सव साजरा करण्यात आला नाही. मर्यादित स्वरूपात सुद्धा दहीहंडीसाठी परवानगी मिळाली नाही. परंतु दुसरीकडे काही भागात काही मंडळांनी दहीहंडी उत्सव केला. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन दुजाभाव करत आहे असे स्पष्ट होते असेही यश आमले यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here