Home Breaking News मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! बनावट धनादेश देऊन केली आठ लाखाने फसवणूक

मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! बनावट धनादेश देऊन केली आठ लाखाने फसवणूक

 

महादेव राऊत

शेगांव : जिवलग मित्रानेच विश्वास घात केल्याची घटना शेगांव शहर येथे घडली आहे,खोटा धनादेश देऊनही उधारीचे पैसे न दिल्याने शेगांव शहर पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, श्रीपाद सुरेश गणोरकार व देवकृष्ण वासुदेव तिरुख दोघांचेही वय 40वर्षे राहणार शेगांव यांच्या मध्ये मित्रत्वाचे संबंध होते,श्रीपाद गणोरकार यांचे होलसेल किराणा दुकान असल्याने त्यांनी आपला मित्र देवकृष्ण तिरुख व त्यांची पत्नी विजया यांना उधारी मध्ये आठ लाख पंधरा हजार रुपयांचा किराणा माल नोव्हेंबर 2019 पासून तर जानेवारी 2021 पर्यन्त उधारी मध्ये दिला होता, हे उधारीचे पैसे देण्यासाठी देवकृष्ण तिरुख यांनी खोटे चेक दिल्याने श्रीपाद गणोरकार हे आपल्या उधारीचे पैसे मागण्यांसाठी गेले असता त्यांना देवकृष्ण तिरुख आणि पत्नी विजया यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे श्रीपाद गणोरकार यांनी जे एम एफ सी, सा, कोर्ट शेगांव येथे तक्रार दाखल करून त्यांच्या आदेशानुसार कलम 156 (3) सी आरपीसी प्रमाणे गुन्हे नोंद करून आरोपी पती, पत्नी विरुद्ध कलम 42, 406, 468, 471, 294, 504,506,34,भांदवी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले,पुढील तपास पोलीस स्टेशन शेगांव शहर ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण डांगे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here