Home Breaking News लग्नाला नकार दिल्याचे कारणावरून मुलीच्या काकाचा खून; मारहाणीत वडील गंभीर

लग्नाला नकार दिल्याचे कारणावरून मुलीच्या काकाचा खून; मारहाणीत वडील गंभीर

( मृतक नूर खान वरील फोटोत दिसत आहे)

जामोद येथील घटना ; तालुक्यात खळबळ

जळगाव जामोद : तालुक्यातील जामोद येथे 4 आरोपींनी लग्नाला नकार दिला म्हणून मुलीच्या काकाचा खून व वडीलास गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली याविषयी सय्यद अमीन सय्यद अफसर यांनी आज एक सप्टेंबर सकाळी  जळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

 

या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की मृतक नूरखान समशेर खान ,जखमी रसूलखान, व चारही आरोपी आम्ही जामोद येथील एकाच मोहल्ल्यात राहतो जखमी रसूलखान यांची मुलगी ही दहावीत शिकत असून तिला शाळेत जाताना आरोपी क्रमांक 1 शेख सद्दाम हा नेहमी तिला त्रास देत असे तेव्हा मृतक नूरखान यांनी त्याला समजून सांगितले होते ,शेख सद्दाम याचे वडील आरोपी क्रमांक 2 शेख नजीर यांनी 10 दिवसापूर्वी मुलीच्या वडिलांकडे तिची आपल्या मुलासाठी विवाहासाठी मागणी केली होती परंतु त्यांनी ती मान्य केली नाही मंगळवारी संध्याकाळी शेख नजीर यांनी मुलीचे काका रसूलखान यांना मुलीच्या यासंबंधी विचारणा करण्यासाठी बोलावले असता त्यांनी नकार दिला यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला शेख सद्दाम यांच्या घरासमोरच आरोपी क्रमांक 3 शेख बशीर यांनी नूरखान यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली ही मारहाण सोडवण्यासाठी रसूलखान आला असता आरोपी क्रमांक एक शेख सद्दाम यांनी या चाकूने पोटावर डोक्यावर मांडीवर वार केले आरोपी क्रमांक दोन शेख नजीर यांनी मयत नूरखान वर वार केले तसेच आरोपी क्रमांक चार शेख जुबेर यांनी जखमी रसूलखान याला मारहाण केली नूरखान व रसूल खान यांना ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारीनि नूरखान याला मयत घोषित केले तर रसूल खान यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302, 307, 34 भारतीय दंडविधान नुसार गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पीएसआय सचिन वाकडे करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here