Home खामगाव तालुका मराठा पाटील युवक समितीची उमरा भिसे येथे शाखा स्थापना

मराठा पाटील युवक समितीची उमरा भिसे येथे शाखा स्थापना

 

खामगाव : तालुक्यातील उमरा भिसे येथे दि 31 ऑगस्ट रोजी मराठा पाटील युवक समितीच्या 59 व्या शाखेची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.


यावेळी संस्थापक अध्यक्ष गजानन  ढगे यांनी समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कार्याची माहिती देऊन, समाजाला भविष्यात प्रगती करायची असेल तर युवकांना संघटित होऊन समाजातील वंचितांचे सोडविणे गरजेचे आहे. यावेळी प्रमूख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष गजानन  ढगे,  जिल्हा संघटक अविनाश कुटे खामगाव तालुका अध्यक्ष मोहन घुईकर, खामगाव शहराध्यक्ष मुन्ना पेसोडे,विद्यार्थी समिती शहराध्यक्ष राम पारस्कार, खामगाव तालुका उपाध्यक्ष श्रीहरी टिकार, तालुका संघटक सागर मुयांडे,केशव पाटील कोलोरी, अनिकेत टिकार विठ्ठल टिकार ,गोपाल टिकार आदींसह शाखेचे पदाधिकारी आणि गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

यावेळी उमरा भिसे शाखा अध्यक्ष म्हनुन गणेश भिसे, उपाध्यक्ष योगेश भिसे, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम भिसे,सचिव परमेश्वर भिसे आदींची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी युवक समिती शाखा उमरा भिसे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here