Home Breaking News काळजीत टाकणारी बातमी ; स्वाभिमानीचे राणा चंदन अत्यावस्थ! रविकांत तुपकर यांनी केलं...

काळजीत टाकणारी बातमी ; स्वाभिमानीचे राणा चंदन अत्यावस्थ! रविकांत तुपकर यांनी केलं हे आवाहन

बुलडाणा : सरकारी वा खाजगी दवाखान्यातील कुठलं सुध्दा काम असो, कोणाला तातडीनं रक्त हवं असो, वा कोणाला मेडीकलसंदर्भात कुठलीही निकड असो.. बुलडाणा शहरात पटकन २ ते ३ नावं जी डोळ्यापुढे येतात त्यात एक नाव, राणा_चंद्रशेखर_चंदन.

कायम रस्त्यावर अक्षरश: धावणारा हा तरणाबांड पोरगा, कोणाच्याही मदतीसाठी क्षणाचा विलंब न करता पळत जाणारा युवा.. आज मात्र अत्यावस्थ अवस्थेत औरंगाबादच्या न्यू सिग्मा हॉस्पीटलच्या अतिदक्षता विभागात उपचारार्थ भरती आहे. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांच्या चमूसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते की ज्यांचा उजवा हात म्हणून राणा ओळखल्या जातो, ते रविकांत तुपकर हे तिथे उपस्थित राहून लक्ष ठेवून आहेत.
गत १५ दिवसांपुर्वी पोटात दुखते म्हणून, राणा चंदन हा संचेती हॉस्पीटलमध्ये चेकींगसाठी गेला. त्यावेळी पोटात पाणी असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर मेहेत्रे हॉस्पीटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु झाले. परंतु राणाची तब्येत केंव्हाही बिघडू शकते म्हणून त्याला औरंगाबादला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. राणाच्या नातेवाईकांनी त्याला तिथल्या घाटी हॉस्पीटलमध्ये अगोदर भरती केले. विशेष म्हणजे त्यावेळी रविकांत तुपकर हे सुध्दा व्हायरलने आजारी होते.
तुपकरांनी राणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला तातडीने न्यू सिग्मा हॉस्पीटलमध्ये आणण्यास सांगितले. गत आठवड्यापासून राणावर त्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. झालेल्या वैद्यकीय चाचण्यानुसार राणा चंदन यांच्या दोन्ही किडन्यांना विकार जडला असून सादुपिंडावरही सूज आली आहे. मेंदूवरचा ताबाही २-३ दिवस सुटला होता. परंतु डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केल्यानंतर प्राप्त माहितीनुसार आज मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी राणाची तब्येत थोडी सुधारत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान राणाला भेटण्यास वाढत असलेली गर्दी पाहता, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे त्यास सध्या कोणीही न भेटण्याचे आवाहन तुपकरांनी केले.

 

-(राजेंद्र काळे सर यांच्या फेसबुक वाँल वरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here