Home खामगाव विशेष गोकुळाष्टमीच्या पावनपर्वावर समाजभुषण, शक्तीउपासक राणा गोकुलसिंहजी सानंदा यांचा वाढदिवस विविध विधायक कार्यक्रमांनी...

गोकुळाष्टमीच्या पावनपर्वावर समाजभुषण, शक्तीउपासक राणा गोकुलसिंहजी सानंदा यांचा वाढदिवस विविध विधायक कार्यक्रमांनी साजरा

(On the day of Gokulashtami, Samajbhushan, Shakti worshiper Rana Gokulsinhaji Sananda’s birthday was celebrated with various constructive programs.)

खामगाव: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष तथा सुप्रसिध्द उदयोगपती राणा गोकुलसिंहजी सानंदा यांचा 86 वा वाढदिवस गोकुलअष्टमीच्या पावन पर्वावर दि.30 ऑगस्ट 2021 रोजी अत्यंत उत्साहपुर्ण वातारणात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम राणा गोेकुलसिहजी सानंदा यांनी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर टॉवर चौकातील हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारुढ पुतळ्याला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, उद्योजक राणा राजेंद्रसिंह सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,राणा मुकेशसिंह सानंदा,राणा आनंदकुमार सानंदा, न.प.कॉंग्रेस पक्षनेता राणा अमेयकुमार सानंदा,राणा गौरवकुमार सानंदा, राणा दिग्वीजयसिंह सानंदा, राणा तन्मय सानंदा,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, विदर्भ कबड्डी हौशी असो.चे अध्यक्ष अशोक देशमुख यांच्यासह श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे पदाधिकारी,खेळाडु ,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनी सकाळपासुन सानंदा निकेतन येथे समाजभूषण राणा गोकुलसिंहजी सानंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाछा देण्यासाठी गर्दी केली होती. अनेक चाहत्यांनी सानंदा निकेतन येथे सोशल डिस्टसिंग ठेवत गोकुलसिंहजी सानंदा यांची  भेट घेतली व त्यांचे अभिष्टचिंतन केले. सकाळपासूनच अडते, व्यापारी, कॉंग्रेसचे पदाधिकारी व अनेक चाहत्यांनी सानंदा निकेतन येथे जावुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक मधुसुदन अग्रवाल,कॉंग्रेसचे नेते विश्वपालसिंह जाधव, बाबासाहेब भोसले, नगरसेवक किशोरआप्पा भोसले,माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, पं.स.सदस्य मनिष देशमुख,पं.स.सदस्य इनायत उल्ला खॉं, माजी नगरसेवक दिनेश अग्रवाल, माजी नगरसेवक अशोक चव्हाण, माजी नगरसेवक अशोक ढगे, माजी नगरसेवक मो.नईम, माजी नगरसेवक परवेजखान पठान, डॉ.आर.के.राजपुत,मोहनभाउ परदेसी, मोहनचंद भागदेवाणी, मोतीराम खवले, धनंजय देशमुख,मयुर हुरसाड, के.डी.पाटील, क्रिडा शिक्षक जाधव, माजी नगरसेवक अमोल बिचारे, अॅड.व्ही.वाय.देशमुख, विक्रम नितनवरे, रणजीतसिंह बयस सर, श्याम भाऊ जैस्वाल, सुरजसेठ अग्रवाल,मनिष, अग्रवाल, निलेश देशमुख, विनोद मिरगे, लअनंता सातव, शांताराम करांगळे यांच्यासह श्री. शीवाजी व्यायाम मंदिराचे पदाधिकारी,कार्यकर्ते व कबड्डी ,कुस्ती खेळाडू ,राणा लकी सानंदा एज्युकेशनल शावर व कॉलेजच्या वतीने ,सानंदा मित्र मंडळ, राणा फाउंडेशन, श्रीनिवास होंडा शोरूम कर्मचारी वृंद,श्रीनिवास टाटा शोरूम कर्मचारी वृंद यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ,नागरिक, पत्रकार बांधव तसेच अनेक समाजसेवी संस्थांनी देखील राणा गोकुलसिंहजी सानंदा  यांना निमित्त अभिष्टचिंतन केले.


तद्नंतर गोकुळ नगर येथे जाउन समाजभुषण राणा गोकुलसिंहजी सानंदा यांनी स्व.सोनाबाई सानंदा यांच्या समाधीस्थळी जाउन पुतळयाला माल्यार्पण केले. तद्नंतर नांदुरा रोड येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या दीर्घायुष्यासाठी रामरक्षा स्त्रोतचे पठन करण्यात आले.यावेळी त्यांच्या समवेत राणा राजेंद्रसिंह सानंदा, राणा दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा,राणा मुकेशसिंह सानंदा, राणा गौरवकुमार सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.
फरशी येथील सप्त गौ परिक्षक्रमा केंद्रामध्ये राणा गोकुलसिंहजी सानंदा यांच्या हस्ते गौमातेचे पुजन करुन चारा व ढेपीचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा, सौ.दिशाताई हजारी आदी उपस्थित होते.यावेळी सप्त गौ परिक्रम केंद्राच्या वतीने संचालक रमेश चुडीवाले यांनी वाढदिवसानिमित्त राणा गोकुलसिंहजी सानंदा यांचे शाल व पुष्पहार घालुन अभिष्टचिंतन केले. यावेळी सप्त गौ परिक्रमा केंद्राचे पंकज चुडीवाले, सदाषिव कुळकर्णी उपस्थित होते.
तसेच राणा गोकुलसिंहजी सानंदा  याांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय येथील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, युवक कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल,जसवंतसिंग शीख, सुरेश बोरकर, सचिन थोरात, अन्सारभाई, सुरज गवई, सागर पाटील,पिंटुभाउ आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here