Home शेगाव विशेष सुसंस्कारीत व आदर्श विद्यार्थी घडविणे असे शिक्षकांचे अतुलनीय कार्य – अशोकराव तायडे,गटविकास अधिकारी

सुसंस्कारीत व आदर्श विद्यार्थी घडविणे असे शिक्षकांचे अतुलनीय कार्य – अशोकराव तायडे,गटविकास अधिकारी

 

प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार

शेगांव : महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने नुकतेच रूजू झालेले गटविकास अधिकारी अशोकराव तायडे यांचा पंचायत समितीच्या दालनामध्ये दि.३० ऑगष्ट रोजी प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षकांचे हे आदराचे स्थान असुन विद्यार्थ्यांना आदर्श सुसंस्कारीत नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षक करत आहेत,शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनाचे शिल्पकार असुन विद्यार्थी त्यांना आजन्म विसरूच शकत नाहीत असे गौरवास्पद भावना त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केल्या.
याप्रसंगी उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक दामोदर,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी अंनतराव वानखडे,ओमप्रकाश इंगळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here