Home Breaking News उद्या “मंदिर हम खुलवायेंगे,धर्म को न्याय दिलायेंगे ” नारा गुंजणार; भाजपाचं मोठं...

उद्या “मंदिर हम खुलवायेंगे,धर्म को न्याय दिलायेंगे ” नारा गुंजणार; भाजपाचं मोठं आंदोलन

भाजपचे ३० ऑगस्टला शेगाव येथे शंखनाद आंदोलन

जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांचे सहभागी होण्याचे आवाहन

 

खामगाव : भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू केले असताना फक्त हिंदू धर्मांचे मंदिरच बंद करून ठेवले आहेत म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्रावण महिन्याच्या पवित्र चौथ्या सोमवारी आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शंखनाद आंदोलनाची घोषणा केली आहे.
३० ऑगस्ट २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे सकाळी ठीक १० वाजता घंटा नाद आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे, ज्येष्ठ नेते चैनसुख जी संचेती, भाजपा जिल्हा अध्यक्ष आ.आकाश फुंडकर,चिखली मतदार संघाच्या मा. आ.सौ.श्वेता ताई महाले, आ.विजयराजे शिंदे, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. सीताराम ठोकळ महाराज यांच्या प्रमुख नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष,आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष जळगाव जामोद आंदोलन यांनी दिली आहे.


तरी सर्व हिंदू प्रेमी, हितचिंतक,  लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी,मंडल पदाधिकारी, जिल्हा व तालुका,शहर युवा मोर्चा,जिल्हा व तालुका,व शहर महिला आघाड्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष,सदस्य व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे आंदोलन करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here