Home Breaking News असे काही घडले आणि तरुणीने धावत्या रिक्शातून घेतली उडी

असे काही घडले आणि तरुणीने धावत्या रिक्शातून घेतली उडी

 

औरंगाबाद : शहरात एक धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

आज सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास जालना रोडवर मोंढा नाका येथून एक महाविद्यालयीन तरुणी रिक्षा मध्ये बसली ती एकटीच त्या रिक्षात होती त्यामुळे रिक्षात बसल्या बसल्या त्या तरुणीला त्या रिक्षाचालका विषयी संशय आला व तिने त्या रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले परंतु तो रिक्षा अजूनच वेगाने घेऊन जाऊ लागला,शेवटी घाबरून त्या तरुणीने थोडे पुढे जात नाही तर चालत्या वेगवान रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेतली.

तरुणी रिक्षातून पडल्याचे पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोक तिच्या मदतीसाठी धावले. तरुणीची अवस्था पाहून तिला धीर देत तिच्या कुटुंबियांना बोलावले. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती स्थीर आहे तिला सध्या घरी पाठवण्यात आले. पोलिसांनी नराधम रिक्षाचालकाला अटक केली आहे. 50 वर्षीय आनंद अंबादास पहुंळकर असे या आरोपीचे नाव आहे. हा भाड्याने रिक्षा चालवत होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान जखमी झालेल्या तरुणीच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते धावून आले आणि त्यांनी नातेवाईकाना माहिती दिली आणि तरुणीवर उपचार करण्यात आले.

अँब्युलन्स हेल्प रायडर्सकडून मदत

अँब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुप मधील सक्रिय सदस्य निलेश सेवेकर हा आकाशवाणी कडे जात असताना हा सर्व प्रकार त्याच्या नजरेस पडला व तातडीने निलेशने जखमी अवस्थेतील मुलीला रस्त्याच्या कडेला घेऊन जात तिला हिम्मत देण्याचा प्रयत्न केला व तिची विचारपूस करत तिच्या घरच्यांना संपर्क साधत त्या मुलीच्या पालकांना तातडीने तिथे बोलावले आणि उपचार करण्यासाठी रवाना केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here