Home Breaking News घरातून तलवार जप्त, भाजपा नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल

घरातून तलवार जप्त, भाजपा नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल

 

खामगाव : पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया सर, अपर पोलीस अधीक्षक श्री हेमराज सिंग राजपूत व श्री बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गीते सर यांचे आदेशाने  29 ऑगस्ट रोजी पो.स्टे शिवाजीनगर हद्दीमध्ये घाटपुरी नाका भागात पोलिसांनी छापा टाकला . यात एक धारदार तलवार जप्त करून भाजपा नगरसेवकाच्या मुलावर कारवाई करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

भाजपा नगरसेवक पुत्र अनमोल ओमप्रकाश शर्मा, रा. घाटपुरी नाका, ता खामगाव, जिल्हा – बुलढाणा असे आरोपीचे नाव असून त्यांच्या घरातून एक लोखंडी पात्याची धारदार तलवार किंमत अंदाजे एक हजार रुपये जप्त केली आहे.
ही कारवाई पो उप नि श्रीकांत जिंदमवार, साहेबराव राठोड, दशरथ जुमडे,श्रीकृष्ण चांदूरकर, गजानन आहेर, विजय सोनोने
सरिता वाकोडे, सुधाकर बर्डे यांनी केली. दरम्यान शहरात अन्यय ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले असून भुसावल चौक भाागात सुद्धा शस्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here