Home Breaking News अकोला येथे उच्चभ्रू वस्तीत चालत होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश

अकोला येथे उच्चभ्रू वस्तीत चालत होते सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश

अकोला : गेल्या काही दिवसांत अकोला शहरात सेक्स रॅकेट सक्रिय आहे. ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान अकोल्यामध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका उच्चभ्रू वस्तीत देहविक्री सुरु असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकत ३ महिला आणि दोन ग्राहकांना अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई करत येथे हा प्रकार समोर आणला आहे.

अकोल्यातील गौरक्षण रोडवरील आदर्श कॉलनीतील एका घरात देहविक्री करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांनी दिली आहे. श्रीरंग सणस यांना या सेक्स रॅकेटचा माहिती मिळाली होती. त्यांनी या परिसरात येऊन तीन महिलांसह दोन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी अशी माहिती समोर आली कि, पैशांचे आमिष दाखवून महिला आणि तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे.

 पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांच्या मागणीनुसार आदर्श कॉलनी इथे तरुणींचा पुरवठा केला जात आहे.  मुलींच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांचा वापर अशा पद्धतीने केला जात आहे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळतं त्यांनी येथे छापा टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here