Home काव्य कट्टा गाव पातळीपर्यंत अक्षर मानव ची रूजवात व्हावी – जेष्ठ साहित्यिक राजन खान

गाव पातळीपर्यंत अक्षर मानव ची रूजवात व्हावी – जेष्ठ साहित्यिक राजन खान

पुणे : राजेंद्र इनामदार यांनी टाकावू प्लास्टीक बॉटल्सचा उपयोग करून बांधलेल्या हाऊस ऑफ पेट बॉटल, डोणजे फाटा, हॉटेल रानवारा जवळ, पायगुडेवाडी, पुणे येथे दिनांक २१,२२ ऑगस्ट २०२१ रोजी अक्षर मानव राज्य कार्यकारिणीची बैठक श्रीकांत डांगे, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, अक्षर मानव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत अक्षर मानव च्या पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, सर्व विभाग प्रमुख यांची भेट होणे सर्वांच्या दृष्टीनं, संघटनेच्या आणि समाजाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असल्यामुळे कोणतीही सबब न देता राज्यातले सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व विभागांचे सर्व राज्यप्रमुख. राज्य अध्यक्ष, प्रशासन विभागप्रमुख देश अध्यक्ष यांनी बैठकीला उपस्थिती दर्शवली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जेष्ठ साहित्यिक राजन खान म्हणाले की, माणसाला माणूस जोडण्रायाचे काम चांगल्या पद्धतीने होत असून ते आणखी गतिमान पद्धतीने होणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य कार्यकारिणी बैठकीला काही लोक आले नाहीत, काही लोक त्यांच्या वाट्सअप ग्रुपवरही क्रियाशील नाहीत. तर पदांची नव्यानं भरती यावर विचार सुरू करा.
कामं करायचीत, वाढवायचीत, वेग द्यायचाय, तर क्रियाशील माणसं नेमू. काम न करणारामुळं संघटनेतल्या दुसऱ्यांच्या आयुष्याचा मौल्यवान वेळ वाया जातो. ही गोष्ट घातक आहे. कार्यकारिणीनं ही बिनकामाची माणसं वगळावीत तसेच गाव पातळीपर्यंत अक्षर मानव ची रूजवात व्हावी.
यावेळी उपस्थितांमध्ये प्रणोती पाटील, श्रीकांत डांगे, सतिश इंदापूरकर, अभि मंगल, रोहिदास कवळे, प्राजक्ता कावळे, गिताश्री मगर, रश्मी घासकडबी, प्रवीण अंजली, प्रवीण जावळे, दिपेश मोहीते, निलिमा पगारे, कल्पिता पावसकर, अमित मंगल, प्रशांत गवंड, सृजन वटके, अतुलकुमार बेद्रे, मीना शेटे, पोर्णिमा सुतार, अनिता आंबेकर, सत्य कुटे , रेवती सनांसे, आशिष घाडगे, विजय यादव, जयंत देशमुख, संतोष शिंदे, यांनी सहभाग नोंदवला, बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रशासन प्रमुख सचिन पवळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

 

पत्रकार / मुक्त पत्रकार/ स्तंभलेखक बना…आमच्या पेपर आणि वेबपोर्टल करिता लिखाण करा…

-94 2323 7001

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here