Home खामगाव विशेष भाजयुमोची खामगाव शहरात 1100 मोटरसायकलची रॅली

भाजयुमोची खामगाव शहरात 1100 मोटरसायकलची रॅली

 

युवा मोर्चा भाजपाच्या विजयाची पहिली पायरी – प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील

खामगाव : भाजपा चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे बुलढाणा जिल्हा दौ-यावर आले होते. या दरम्यान काल सायंकाळी खामगांव मतदार संघात त्यांचे त्यांचे जंगी स्वागत करण्यात. खामगांव शहरात 1100 मोटरसायकलची रॅली काढण्यात आली. यानंतर या रॅलीचे सभेत रुपांतर झाले यावेळी बोलतांना विक्रांत पाटील म्हणाले की युवा मोर्चा हे भाजपाची पहिली पायरी आहे.
काल खामगांव रोजी भाजपा चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या शुभहस्ते खामगाव मतदार संघात युवा वॉरियर्स च्या शाखांचे उदघाटन करण्यात आले. खामगांव शहरात सती फैल येथे युवा वॉरीयर्सचे शाखेचे उदघाटन माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठया संख्येत युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या उदघाटन प्रसंगी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी प्रचंड घोषणा देऊन वातावरण उत्साहित केले.
खामगांव शहरात आगमनानंतर सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन मा.चंद्रशेखरजी बावनकुळे व विक्रांतजी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा दिल्या यावेळी संपुर्ण परिसर दुमदुमून गेला. यांनतर चंद्रशेखर बावनकुळे व विक्रांत पाटील हे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या समवेत बुलेट वर स्वार होऊन रॅलीमध्ये सहभागी झाले. युवकांचा उत्साह पाहून मान्यवर आपला दुचाकीव्दारे रॅलीत सहभागी होण्याचा मोह आवरू शकले नाही. यानंतर संपुर्ण खामगांव शहरातून रॅलीने मार्गक्रमण केले. यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करुन स्वागत करण्यात आले.


या रॅलीचे रुपांतर कोल्हटकर स्मारक मंदीर येथे सभेत रुपांतर झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना चंद्रशेखरी बावनकुळे म्हणाले की, आमदार ॲड आकाश फुंडकर हे दुरदृष्टी लाभलेले युवा नेतृत्व आहे. खामगांव मतदार संघाचा प्रचंड विकास करुन त्यांनी चेहरा मोहरा बदलवून टाकला आहे. सर्वात जास्त कामे करुन घेणारा व निधी खेचून आणणा-या 10 आमदारांपैकी आमदार ॲड आकाश फुंडकर हे एक आहेत. राज्यातील या बिघाडी सरकार ॲटो आता पंक्चर करायचा आहे. जो मुख्यमंत्री 14 महिने मंत्रालयात जात नाही तो सर्वांत चांगला मुख्यमंत्री कसा असू शकतो ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तर राज्यातील हे सर्वांत बोगस सरकार असून जनतेला हे सरकार अक्षरश: छळत आहे. हे सरकार अगदी निकम्म आहे. त्यामुळे हे सरकार लवकरच घरी जाईल.
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यावेळी म्हणाले की, युवा मोर्चा ही भाजपाच्या विजयाची पहिली पायरी आहे. राज्यात जे विविध क्षेत्रात युवक कार्य करीत आहेत त्या सर्व युवकांचा समावेश युवा वॉरीयर्स मध्ये सहभागी होऊ शकतील, यात क्रिडा,लेखन, अभ्यास, इतर कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या युवकांचा युवा वॉरीयर्स मध्ये सहभाग राहिल 18 ते 25 वर्षातील युवकांना युवा वॉरीयर्स होता येईल. बुलढाणा भाजपा प्रत्येक वेळी प्रदेशाने दिलेली जबाबदारी 100 टक्के पार पाडली आहे. यावेळी पण युवा मोर्चा खामगांव मतदार संघातून 10000 युवा वॉरीयर्स देतील असा विश्वास व्यक्त करतो.


विक्रांतजी पाटील पुढे म्हणाले की, जिल्हयात दाखल झाल्यावर मातृतिर्थ स्थळी मॉ जिजाऊ आई साहेबांचे आशिर्वाद घेऊन दौरा सुरु केला, सिंदखेड राजा, देऊळगांव राजा,चिखली नंतर खामगांव येथे येण्यास उशीर झाला त्यामुळे मला कार्यकर्त्यांच्या उपस्थिती बददल शंका होती. परंतु खामगांव शहरात पदार्पण करताच युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या गाडयांवर भाजपाचे झेडे दिसू लागले. खामगांव शहरातील सर्व परिसर भाजपामय झालेला दिसला. आणि रॅलीत सहभागी झाल्यावर खामगांव भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राम मिश्रा व विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, पवन गरड यांच्या नियोजनाचे कौतुक केल्या शिवाय मला रहावल नाही. उत्कृष्ठ नियोजनातूनच हे शक्य होते. आणि आमदार ॲड आकाश फुंडकर यांचा देखील आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर असलेला विश्वास ज्यामुळे त्यांना माहिती होते की आपल्या युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीवर सोपवलेली ही कामगिरी ते 10 टक्के पुर्ण करतील.
यांनतर खामगांव भाजपाच्या उत्कृष्ट नियोजनाबददल राम मिश्रा व पवन गरड यांचेसह भाज युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मा.विक्रांतजी पाटील यांनी सत्कार केला. या वेळी मंचावर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बादलजी कुळकर्णी, माजी आमदार विजयराजजी शिंदे, भाजपा सोशल ‍मिडीया प्रदेश सेलचे प्रांत संयोजक सागर फुंडकर, सचीन देशमुख युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, नगराध्यक्षा अनिता डवरे, गजाननराव देशमुख जिल्हाध्यक्ष् किसान आघाडी, विनोद वाघ जि.प. सदस्य, शरदचंद्र गायकी, संजय शिनगारे, संतोष देशमुख, अनिता देशपांडे प्रदेश सदस्या महिला आघाडी, रत्ना डिक्कर, संगिता उंबरकार किसान आघाडी, चंद्रशेखर पुरोहित, यांचेसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राणा राकेश राठोड जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा तथा नगरसेवक, नरेंद्र शिंगोटे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, विजय महाले जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा, राम मिश्रा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा खामगाव शहर, पवन गरड जिल्हा अध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी, नगेन्द्र अण्णा रोहनकार शहर संघटक भाजपा युवा मोर्चा खामगाव शहर, रुपेश खेकडे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा खामगाव तालुका, आशिष सुरेखा जिल्हा सरचिटणीस भाजपा विद्यार्थी आघाडी, पवन ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी, राहुल जाधव जिल्हा सहसचिव भाजपा विद्यार्थी आघाडी, शुभम देशमुख अध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी खामगाव शहर, राज टिकार पाटील अध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी खामगाव तालुका यांचेसह भाजपा खामगांव शहर व ग्रामीण यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपा विद्यार्थी आघाडी, भाजपा महिला मोर्चा, भाजपा युवती मोर्चा, खामगाव विधानसभा मतदार संघ हे मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here