Home Breaking News आमदार संजय गायकवाड यांनी दिला हा इशारा ; पहा व्हिडीओ

आमदार संजय गायकवाड यांनी दिला हा इशारा ; पहा व्हिडीओ

केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणे यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा आता वादात सापडली आहे आपल्या बेधडक फक्त यासाठी ओळखले जाणारे नारायण राणे आता मात्र चांगलेच कचाट्यात सापडले असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेल्या नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचं गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आलं आहे. राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले आ. संजय गायकवाड

बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड आक्रमक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर पडत आहेत शिवसेनेच्या वतीने ठिकाणी आंदोलने केला जात आहेत दरम्यान शिवसेनेतील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून नारायण राणे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी राणे यांना अटक केली नाही तर कोकणात जाऊन त्यांना घरात घुसून मारू आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक काय असतात हे दाखवून देऊ असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

पहा व्हीडीओ..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here