Home Breaking News अरेरे !दारूची सवय नडली आणि अशी विपरीत घटना घडली

अरेरे !दारूची सवय नडली आणि अशी विपरीत घटना घडली

 

नांदुरा : शहरातील शिवाजीनगर येथील 45 वर्षे इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली गजानन महादेव खेतकर वय 45 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.


याबाबत विजय गजानन खेतकर यांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की,त्यांचे वडील गजानन महादेव खेतकर वय 45 वर्ष राहणार शिवाजीनगर यांना दारू पिण्याची सवय होती ते नेहमी दारू पीत असत.त्यांनी यापूर्वी दोन तीन वेळा विषारी औषध घेतले होते.त्यांनी आज सोमवारी सकाळी पाच वाजता च्या सुमारास राहत्या घरी टीनाच्या खाली लावलेल्या लाकडी बल्लीला साडी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी ते लटकलेल्या अवस्थेत दिसून आले अशा फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून कलम 174 नुसार मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने सहाय्यक फौजदार गजानन सातव हे करीत असल्याचे नांदुरा पोलिसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here