Home जागर ‘सावली सेवा प्रकल्पाच्या पुढाकारातून २०० दिव्यांग बांधवांना अशीही मदत

‘सावली सेवा प्रकल्पाच्या पुढाकारातून २०० दिव्यांग बांधवांना अशीही मदत

 

शेगाव : संतनगरी शेगांव येथे शहर तालुका तथा परीसरातील अत्यंत गरजु दिव्यांग बांधवांना महिनाभर पुरेल अशी राशण किट वाटप करण्यात आली डॉ विकास बाबा आमटे यांच्या संकल्पनेतुन कोव्हीड 19 या महामारीमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबाना सहकार्य करण्याच्या उदात्त हेतुने महाराष्ट्रभर राबवित असलेल्या मिशन आनंद सहयोग या सामाजिक मोहीमेअंतर्गत सावली सेवा प्रकल्पाच्या पुढाकारातुन सदर उपक्रम घेण्यात आला.
पावसाची रिपरिप दिव्यांग बांधवांच्या समस्या तथा त्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना होणारी तारांबळ आणि त्याहुनही अधिक म्हणजे यादीमध्ये नाव नसलेल्या दिव्यांगाचे प्रश्न या आणि अशा अनेकविध समस्यांचे निरासन करीत सावली परिवारातील सदस्य दिव्यांग प्रतिनिधि जयश्रीताई गीते श्री गजानन महाराज मतिमंद विद्यालयाचे प्राचार्य मा डॉ गजानन मुंढे सर मात्रुशक्ती संघटनेच्या पदाधिकारी महिला सदस्य तसेच आनंदवनातील मिशन आनंद सहयोग चे पदाधिकारी व आनंदवन मित्र परिवार शेगांव चे सदस्य या सर्वांनी भरपुर मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला.


सदर कार्यक्रमाला शेगांव शहराच्या नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच युवा नेते दिनेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिति होती कार्यक्रमाला विशेष सहकार्य विजयबाप्पु देशमुख ज्ञानेश्वर साखरे राजेश विभुते नागेश देशमुख अनंता देशमुख पवन देशमुख सचिन ठाकरे संतोष ढगे शंकर देशमुख राजकुमार व्यास यांचे लाभले.

पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here