Home Breaking News हनुमान सागर धरणातून मोठा विसर्ग ; सेल्फीच्या नादात एकाचा मृत्यू

हनुमान सागर धरणातून मोठा विसर्ग ; सेल्फीच्या नादात एकाचा मृत्यू

 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
वान धरणात ७४.०५ टक्के जलसाठा उपलब्ध

संग्रामपूर :  मागील तीन दिवसापासून सूरू असलेल्या संततधार पावसाचा जोर कायम आहे. वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या जलाशयात पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शनिवारी धरण पाणलोट क्षेत्रात २३ मी मी पावसाची नोंद धेण्यात आली असून एकूण ५९.०६ मी मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या स्थिती धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४०७.१६ मीटर आहे. धरणात ७४.०५ टक्के जलसाठा उपलब्ध असून पाण्याची आवक प्रचंड असल्याने धरणाचे सहापैकी चार दरवाजे उघडण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास दोन दरवाजे बंद करण्यात आले आहे. वान नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी रात्री धरणाचा पहिला व शेवटचा सहावा असे दोन दरवाजे ५० सें मी. ने उघडण्यात आले होते. त्या दोन दरवाज्यातून वान नदीपात्रात ५४.३५ घ मी/से एवढा विसर्ग सोडण्यात येत होता. मात्र धरण्याच्या पाण्यात आवक वाढत असल्याने शनिवारी सकाळी १० वाजताच्या सूमारास अजून तिसरा आणि चौथा असे दोन दरवाजे २५ सें मी. ने उघडण्यात आले आहे. हनुमान सागर धरणाची ऐकून चार दरवाजे उघडले असून त्यामधून वान नदीपात्रामध्ये एकूण ८५.९१ घ मी. से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यास सध्या स्थिती सुरू असलेल्या विसर्गात वाढ होऊ शकते. तसेच पाण्याची आवक कमी झाल्यामुळे शनिवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे बंद करण्यात आले धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस कायम पडत असल्यास लवकरच उर्वरित धरणाचे दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याच्या विसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या स्थिती हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे उघडले असून वान धरना मधुन विसर्ग दि 21 ऑगस्ट रोजी सूरू असल्याची माहिती नारायण लोणार शाखा अभियंता यांनी दिली आहे.

 

नदीत पाय घसरून नदीत मृत्यू

 

जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील 23 वर्षीय अनिल रामकृष्ण सारोकार या तरुणाचा शनिवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी वान नदीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मयत अमोल सारोकार हा तरुण एका कार्यक्रमासाठी वारिहनुमान येथे गेला होता प्राथमिक माहितीनुसार हा तरुण मोबाईल मध्ये सेल्फी काढताना त्याचा पाय घसरला व वाहत्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला सदर तरुणाचा मृतदेह वान धरणापासून तीन किलोमीटर असलेले वारखेड  येथे सापडला आहे वान नदी धरणावरील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी चार दरवाजे उघडल्याने वान नदी तुडुंब वाहत होती.

व्हिडिओ पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here