Home शेगाव विशेष झाडेगाव येथे प्रहार शाखेची स्थापना

झाडेगाव येथे प्रहार शाखेची स्थापना

 

शेगांव  तालुक्यातील झाडेगाव येथे २१ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना करण्यात आली.शाखा स्थापेनेच्या वेळी कुशल सारवान प्रहार कामगार संघटना अध्यक्ष शेगांव ,सिद्धनाथ केंगाटकर तालुका अध्यक्ष शेगांव, ज्ञानेश्वरभाऊ मेहेंगे शाखा अध्यक्ष घुई तथा सरपंच घुई,विजुभाऊ फुलकर शाखा अध्यक्ष ग्राम पाळोदी,सोनू सारवान सह सचिव कामगार संघटना शेगांव आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थिीमध्ये झाडेगाव येथे प्रहार शाखेची स्थापना करण्यात आली.स्वागत समारोह कार्यक्रम नागेश्वर सुपिनाथ मंदिर येथे पार पडला असून गोवर्धन तू.पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शाखा उद्धघटनाअसाठी आलेल्या सर्व प्रहार कार्यकर्त्यांचे झाडेगाव येथील  प्रहार शाखा कार्यकर्त्यांच्या  वातीन शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही राजकारण न करता सामाजिक कार्य अविरत करत राहू.कोणात्याही गरजू रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास रक्त दान करू,दीव्यांग, निराधार लोकांच्या मदतीला कुठंही अन्याय होत असेल तर तो प्रहार च्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू

-प्रहार संघटना, झाडेगाव ता.शेगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here