Home खामगाव विशेष खामगाव येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ पद त्वरित भरावे

खामगाव येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ पद त्वरित भरावे

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना धनंजयदादा देशमुख यांचे निवेदन

खामगाव : शेतकरी व नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी खामगाव येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ पद त्वरित भरावे अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसचे अमरावती विभागीय समन्वयक धनंजयदादा देशमुख यांनी केली.
महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनवर भेट देण्यासाठी आले होते. गुरुवारी रात्री ते शेगाव येथे मुक्कामी होते. आज सकाळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची धनंजयदादा देशमुख यांनी भेट घेवून निवेदन दिले.
खामगाव येथे दुय्यम निबंधक श्रेणी १ पदचे पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. खामगाव बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असून येथे मालमत्ता व शेती खरेदी दस्त नोंदणी तसेच अन्य व्यवहार व कामे मोठ्या प्रमाणात चालतात. मात्र खामगाव येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ हे पद रिक्त आहे.त्यामुळे खरेदी विक्री व्यवहार खोळंबले असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच शेतकरी बांधव व नागरिकांना बँक व अन्य कामासाठी लागणारे मूल्यांकनपत्र, अन्य दस्तऐवज मिळत नाही. परिणामी त्यांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबी धनंजयदादा देशमुख यांनी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोर मांडल्या. सोबतच विविध विषयावर चर्चा केली तसेच खामगाव येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ पद त्वरित भरावे, अशी मागणी केली.

यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे माझी प्रदेशाद्यक्ष माणिकराव ठाकरे , काँग्रेस कमिटी जिल्हाद्यक्ष राहुल बोंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, जिल्हा परिषद सभापती ज्योती पडघान, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, रामविजय बुरुंगले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मनीषा ताई पवार, सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष श्लोकानंद डांगे, किरणबापू देशमुख, यांची उपस्थित होते. यावेळी धनंजयदादा देशमुख यांनी विविध विषयावर चर्चा केली तसेच खामगाव येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ पद त्वरित भरावे, अशी मागणी केली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मयूर हुरसाड, विजय काटोले, बबलू पठाण,रोहित राजपूत, नितीन ( लारा) गावंडे, निखिल मुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

खामगाव येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ हे पद रिक्त आहे.त्यामुळे खरेदी विक्री व्यवहार खोळंबले असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच शेतकरी बांधव व नागरिकांना बँक व अन्य कामासाठी लागणारे मूल्यांकनपत्र, अन्य दस्तऐवज मिळत नाही. परिणामी त्यांची गैरसोय होत आहे. या सर्व बाबी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोर मांडल्या.”

– धनंजयदादा देशमुख 

अमरावती विभागीय समन्वयक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here